घरदेश-विदेशकरोना संकट काळ ही संधी

करोना संकट काळ ही संधी

Subscribe

करोना संकटाचा हा काळ संधीत रुपांतरित करावा अशी आज प्रत्येक भारतीयांच्या मनात इच्छा आहे. या स्थितीचा आपण भारतीय अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारा क्षण म्हणून उपयोग केला पाहिजे. आपण वैद्यकीय उपकरणे बनविण्याच्या क्षेत्रात स्वावलंबी होऊ शकतो. आपण कोळसा आणि खनिज क्षेत्रात स्वयंपूर्ण होऊया. मी आशा करतो की आपण खाद्यतेलाच्या उत्पादनात प्रगती करू शकू. भारत खताच्या उत्पादनात देखील स्वयंपूर्ण होऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात भारत स्वावलंबी बनण्याची भारताला संधी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

कोलकातामध्ये झालेल्या इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्सच्या एका विशेष कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात बंगाली भाषेत केली. ते म्हणाले की, आपण संपूर्ण ताकदीनिशी करोनाचा सामना करत आहोत. आपण त्यावर नक्कीच विजय मिळवू. आपले करोना योद्धे त्याचा सामना करत आहेत. मात्र हा करोनाच्या संकटाचा काळ ही संधी आहे. आत्मनिर्भर होण्याची संधी.आपण वैद्यकीय उपकरणे तयार करण्याच्या क्षेत्रात आत्मनिर्भर झालो. आपण कोळसा आणि खनिजांच्या क्षेत्रांत स्वयंपूर्ण झालो.आपण खाद्य तेलाच्या उत्पादनात स्वावलंबी झालो. जर खताच्या उत्पादनात भारत स्वावलंबी झाला.

- Advertisement -

इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करण्यात भारत स्वयंपूर्ण झाला. असे अनेक जर आज भारतीयांच्या मनात आहेत. गेल्या ५-६ वर्षांत भारताला आत्मनिर्भर करण्याचे आमचे सर्वप्रथम लक्ष्य राहिले आहे. करोना संकटाने याची गती आणखी वाढवण्याचा धडा दिला आहे. यातूनच आत्मनिर्भर भारत अभियान पुढे आले आहे. कठीण काळाने नेहमीच भारताची इच्छाशक्ती वाढवली आहे. करोनानंतर आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या दिशेने आपल्याला पावले टाकायची आहेत. प्रत्येक भारतीयाच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल, की भारत या क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर बनू शकतो.

पंतप्रधान मोदी म्हणाले, कुटुंबातही मुलगा अथवा मुलगी जेव्हा १८-२० वर्षांचे होतात, तेव्हा आई-वडील म्हणतात, की आपल्या पायावर उभे राहायला शिका. आपण आत्मनिर्भर होण्याचा पहिला धडा घरातूनच शिकतो. भारतालाही आपल्या पायावर उभे राहावे लागेल. भारताने परावलंबित्व कमी करावे. दुसर्‍या देशांवर कमीतकमी अवलंबून राहावे. जी गोष्ट भारताला आयात करावी लागते, ती भारतातच कशी तयार होईल? आणि भविष्यात भारतच त्या गोष्टींचा एक्पोर्टर कसा बनेल? या दिशेने आपल्याला काम करावे लागेल. लोकलसाठी व्होकल होण्याची वेळ आहे. देशाला आणि प्रत्येक जिल्ह्याला आता आत्मनिर्भर बनवण्याची वेळ आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -