घरताज्या घडामोडीपांडुरंगाच्या पंढरीत कोरोनाचे नवे ७ पॉझिटिव्ह रुग्ण

पांडुरंगाच्या पंढरीत कोरोनाचे नवे ७ पॉझिटिव्ह रुग्ण

Subscribe

गेल्या दोन दिवसांपूर्वी पांडुरंगाच्या पावन नगरीत दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखीन सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून पंढरपुरी नगरी तीन प्रादुर्भावापासून दूर होती. पण, गेल्या दोन दिवसांपूर्वी पांडुरंगाच्या पावन नगरीत दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखीन सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता पांडुरंगाच्या पंढरीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

या भागात आढळले कोरोना रुग्ण

पंढरपुरात नव्याने आढळलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे कर्मवीर भाऊराव औदुंबर पाटील नगर, जुनी पेठे, नवी पेठ आणि प्रदक्षिणा मार्गावरील आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याचे काम प्रशासनामार्फत सुरु करण्यात आले आहे. आषाढी यात्रेच्या कालावधीत कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्यामुळे भाविकांसह शहरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन त्यादरम्यान अनलॉक-२ सुरू होणार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -