घरCORONA UPDATECoronaVirus: कोरोनाची सर्वाधिक लागण तरुणांमध्ये, राज्य आरोग्य विभागाचा अहवाल

CoronaVirus: कोरोनाची सर्वाधिक लागण तरुणांमध्ये, राज्य आरोग्य विभागाचा अहवाल

Subscribe

महाराष्ट्रामध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये तरुणांचा आकडा सर्वाधिक असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

कोरोनाचा सर्वाधिक धोका हा वृद्ध व्यक्तींना असल्याने त्यांना खबरदारी घेण्यास सांगण्यात येत आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये तरुणांचा आकडा सर्वाधिक असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. २१ ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये सर्वाधिक ४४ रुग्ण तर ६१ ते ७० वयोगटातील त्याच्या निम्मे म्हणजे २२ रुग्ण सापडले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० पार

महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच सध्या भारत तिसऱ्या स्टेजमध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाची ही प्रक्रिया तोडण्यासाठी सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. सध्या महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० पार गेला असल्याने चिंता अधिक वाढली आहे. कोरोनाची लागण वृद्ध, अन्य आजार असलेल्या व्यक्तींना पटकन होत असल्याने त्यांना काळजी घेण्याचे सांगण्यात येत आहे. परंतु राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ३० एप्रिलला सकाळी १० वाजता जाहीर केलेल्या कोरोना रुग्णांच्या अहवालात राज्यात २०३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले आहे. यामध्ये २१ ते ४० वयोगटातील तरुणांना सर्वाधिक लागण झाल्याचे दिसून येत आहे. त्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांची संख्या अर्ध्यापेक्षा कमी आहे. सर्वाधिक काळजी घेणारा वयोगट असलेल्या ७१ ते ८० वयोगटातील फक्त ४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचे रुग्ण हे परदेशातून आले असले तरी आता राज्यातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रात आढळलेल्या २०३ रुग्णांपैकी ५९ रुग्ण हे कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने बाधित झाले आहेत. त्यामुळे आता सर्वच वयोगटातील नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – खुशखबर: ‘या’ दिवशी संपणार कोरोनाचे संकट

पुरुषांचे प्रमाण अधिक

महाराष्ट्रात लागण झालेल्या रुग्णांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रातील २०३ रुग्णांमध्ये १२९ पुरुषांना तर ७४ महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

वयानुसार रुग्णांची संख्या

वय                                          रुग्ण

१-२०                                        ०७
११-२०             ृ                          १७
२१-३०                                      ४४
३१-४०                                      ४३
४१-५०                                      ३८
५१-६०                                      २७
६१-७०                                      २२
७१-८०                                      ०४

एकूण                                      २०३

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -