घरताज्या घडामोडीकोरोनाचे रुग्ण वाढतायत त्यामुळे टेस्टिंगचे प्रमाण वाढले पाहिजे - राजेश टोपे

कोरोनाचे रुग्ण वाढतायत त्यामुळे टेस्टिंगचे प्रमाण वाढले पाहिजे – राजेश टोपे

Subscribe

कोरोनाचे प्रमाण वाढत असल्यामुळे आज आरोग्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

राज्यात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णायचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मुंबई, पुणे, अमरावती, रत्नागिरी या भागात कोरोनाचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. तसेच खास करून विदर्भात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना कोरोना संदर्भातील अनेक सूचना देण्यात आल्या. कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे टेस्टिंगचे प्रमाण वाढले पाहिजे, अशी सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कलेक्टर, कमिशनर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली आहे.

थ्री टी प्रिंसिपलचे पालन करणे महत्त्वाचे

राजेश टोपे म्हणाले की, ‘विदर्भात कोरोनाचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे थ्री टी प्रिंसिपलचे पालन करणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची वाढ होत असेल त्या ठिकाणी ट्रॅकिंग करणे म्हणजेच एक केस असेल तर त्यासंदर्भात १० ते १५ लोकांचे ट्रॅकिंग करणे, ट्रेसिंग करणे आणि ट्रिटमेंट करणे महत्त्वाचे आहे. कोरोनाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे हलगर्जीपणा होत आहे, आळस केला जात आहे. त्यामुळे असे करून चालणार नाही.’ याच पार्श्वभूमीवर टोपे यांनी राज्यातील कलेक्टर, कमिशनर आणि आरोग्य कर्मचारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच ज्या ठिकाणी कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढत आहेत, तिथे टेस्टिंगचे प्रमाण वाढले पाहिजे, अशी महत्त्वाची सूचना देण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – लसीकरणाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत – राजेश टोपे


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -