घरताज्या घडामोडीविधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत के सी पडवी, मंत्रीपदाची शपथ घेताना राज्यपालांनी झापले होते

विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत के सी पडवी, मंत्रीपदाची शपथ घेताना राज्यपालांनी झापले होते

Subscribe

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यपदाचा पदभार स्विकारला. नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाचा शोध यानिमित्ताने सुरू झालेला आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचा दावा कायमच राहिला आहे. त्यामुळेच या पदावर कॉंग्रेसच्याच नेत्याची वर्दी लागणार हे निश्चित आहे. या पदासाठी सध्या महाविकास आघाडीत सर्वाधिक पसंती मिळालेले नाव म्हणजे राज्याचे आदिवासी विकास अॅडव्होकेट मंत्री के सी पाडवी यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे. अॅड. के सी पडवी हे सध्या राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहे. खुद्द पडवी यांनीही आपल्या नेमणुकीबाबतचे एक स्पष्टीकरण दिले आहे. (congress MLA K C Padvi may become next speaker of maharashtra legislative assembly)

कोण आहेत अॅड. के.सी. पडवी ?

कॉंग्रेसमधील जेष्ठ नेत्यांपैकीच एक अशी के. सी. पडवी यांची ओळख आहे. राज्याच्या विधानसभेच्या सदस्य पदावर के सी पडवी यांची १९९० पासूनच नाते आहे. सध्या के सी पडवी हे अक्कलकुवा या विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. तसेच महाविकास आघाडीत त्यांच्याकडे राज्याच्या आदिवासी विकास मंत्रालयाचा पदभार आहे. याआधी २००४ मध्ये त्यांनी अक्राणी या अनुसुचित जमातीसाठी राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातून त्यांना वर्षोनवर्षे यश मिळत गेले. कॉंग्रेसमधील एक जेष्ठ नेते म्हणून त्यांच्यावर जबाबदारी असतानाच कॉंग्रेसचा वाढवण्यामध्येही त्यांचा मोलाचा वाटा आहे.

- Advertisement -

मंत्रीपदाची शपथ घेताना पडवींना राज्यपालांनी झापले होते

सातवेळा आमदार असलेले महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात के सी पडवी यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले होते. के सी पडवी यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना त्यांना देण्यात आलेल्या मजकुरापेक्षा अतिरिक्त अशी इतर वाक्ये बोलल्यानेच राज्यपालांची नाराजी त्यांनी ओढावून घेतली होती. मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांच्या उपस्थित पार पडलेल्या कार्यक्रमात राज्यपाल त्यांच्या बोलण्यावर नाराज झाले होते. पडवी यांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी बोलावल्यानंतर त्यांनी मराठीत शपथ घेतली. त्यांची मंत्रीपदाची शपथ संपत आलेली असतानाच त्यांनी निजोजित शपथेपेक्षा जास्त ओळी उच्चारल्या. त्यामुळे राज्यपालांनी त्यांना त्याठिकाणीच सुनावले. त्यांनी घेतलेली शपथ अमान्य करतानाच, राज्यपालांनी पुन्हा शपथ घ्यायला सांगितले. त्याचवेळी पुन्हा शपथेमध्ये इतर वाक्ये बोलू नका असेही ते म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेवर पडवींची प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्षपदावर इतर नावांमध्ये सर्वाधिक असे पसंतीचे नाव म्हणून के सी पडवी यांचे नाव चर्चेत आहे. पण कॉंग्रेसकडून आलेल्या या नावामागे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांची संमती असल्यानेच पडवींच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पडवींनी मात्र या पदावर नियुक्तीच्या चर्चेवर अतिशय सूचक अशी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण अशा चर्चा समोर येतच असतात. पण मला पक्षाचे काम करायचे आहे, जे मी शेवटपर्यंत करत राहणार. पक्षाकडून जी जबाबदारी देण्यात येईल ती मी स्विकारेन असेही ते म्हणाले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -