घरCORONA UPDATECorona Third Wave : तिसरी लाट आली? महिन्याभरात सर्वाधिक मुलांना कोरोनाची लागण

Corona Third Wave : तिसरी लाट आली? महिन्याभरात सर्वाधिक मुलांना कोरोनाची लागण

Subscribe

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणुच्या दुसऱ्य़ा लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. या दुसऱ्य़ा लाटेदरम्यान देशातील सर्वाधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली. तर लाखो रुग्णांचा बळी गेला. मात्र काही दिवसांपासून ही लाट आटोक्यात येत असल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता समोर आलेल्या नव्या आकडेवारीनुसार चिंतेत अधिक भर पडली आहे. कारण राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळत आहे. महिन्याभरात तब्बल कोरोनाबाधित लहान मुलांच्या संख्येत ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या काळात ११ वर्षावरील १८ हजार ४१३ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे.

जुलै महिन्यात राज्यातील १० वर्षाखालील २ लाख बालकांना तर ११ वर्षावरील ४ लाख ६३ हजार मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला. तर सप्टेंबर महिन्यात यात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. ६ सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, १० वर्षाखालील ६ हजार ७३८ बालकांना कोरोनाची लागण झाली. यामुळे कोरोनाबाधित बालकांचे प्रमाण ३.३६ टक्क्यांनी वाढलेय. यात ११ वर्षावरील बालकांचे प्रमाण अधिक असल्याचे पाहायला मिळाले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ११ वर्षावरील १८ हजार ४१३ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला. या वयोगटातील बाधित मुलांच्या संख्येत ४ टक्क्यांनी वाढ झाली.

- Advertisement -

त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत २० वर्षाखालील ६ लाख ८८ हजार २१८ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला. यात २५ हजार १५१ मुलांना गेल्या महिन्याभरात नव्याने कोरोना संसर्ग झाला. राज्यात ११ ते २० वयोगटातील मुलांची संख्या सुमारे २ कोटी १६ लाख इतकी आहे. यातील ४ लाख ८१ हजार ४६२ मुलांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण होऊन गेली. यामुळे या वयोगटातील बाधितांचे प्रमाण २.२३ इतके झाले आहे. तर १० वर्षाखालील बालकांचे प्रमाण ३.१८ टक्के आणि ११ वर्षावरील मुलांचे प्रमाण ७.४२ टक्के इतके आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्या बालकांचे प्रमाण १० टक्के इतके आहे.

देशात अद्याप १८ वर्षाखालील लहान मुलांच्या कोरोना लसीकरणास सुरुवात केली नाही. त्यामुळे सर्वाधिक बालकांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. अशापरिस्थित लहान मुलांची काळजी घेणं तितकेच गरजेचं आहे. तर सणासुदीच्या दिवसांत वाढणाऱ्या गर्दीमध्ये ही संख्या अजूनच वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

- Advertisement -

today petrol diesel price: ऐन सणासुदीतही पेट्रोल- डिझेलचे दर ‘जैसे थेच’ जाणून घ्या आजचे दर

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -