Corona Live Update: MPSC ची पूर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे

महाराष्ट्रात करोना रुग्णाचा आकडा वाढला असून ही संख्या ६४ वरुन ७५ वर पोहोचली आहे.

MPSC Government Exam
MPSC Government Exam

कोरोना व्हायरस व्हायरल झाल्यामुळे त्याचे पडसाद शैक्षणिक क्षेत्रावर देखील पडले आहेत. देशासहीत राज्यातही ३१ मार्च पर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील आपली परिक्षा पुढे ढकलली आहे. ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि ३ मे रोजी रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.


महाराष्ट्रात करोना रुग्णाचा आकडा वाढला असून ही संख्या ६४ वरुन ७५ वर पोहोचली असून करोनामुळे आज एका ६३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.