घरट्रेंडिंगकरोना व्हायरस - १५ प्रवाशांचे अहवाल निगेटीव्ह

करोना व्हायरस – १५ प्रवाशांचे अहवाल निगेटीव्ह

Subscribe

करोना व्हायरस अपडेट - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५,१२८ प्रवाशांची तपासणी

महाराष्ट्रात करोनाचा आजपर्यंत एकही रुग्ण पॉझिटीव्ह आला नसून राज्यात हॉस्पिटलमध्ये खबरदारी म्हणून दाखल केलेल्या सर्व १५ प्रवाशांचे तपासणीअंती रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचे पुण्याच्या एनआयव्ही यांनी स्पष्ट केले आहे. तर, कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या ५ जणांपैकी ३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित दोघांना रविवारपर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे येथील नायडू हॉस्पिटलमधील भरती असलेल्या पाचही जणांना शनिवारी घरी सोडण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि नांदेड येथील भरती केलेल्यांनाही शनिवारी घरी सोडण्यात येईल असं सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल तपासणी सुरू आहे. आतापर्यंत ५१२८ इतके प्रवासी तपासण्यात आले. त्यापैकी ४ प्रवासी महाराष्ट्रातील आहेत. तर, क्षेत्रीय सर्वेक्षणात आढळलेले आणखी ३४ प्रवासी असे एकूण ३८ प्रवासी बाधित भागातून आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या रुग्णांच्या डिस्चार्जसाठी केंद्र सरकारने शुक्रवारी राज्याला मार्गदर्शक सूचना दिल्या. त्यानुसार, संबंधित व्यक्तीच्या चाचणीचा नमुना जर निगेटीव्ह आला तर त्याला डिस्चार्ज देऊन पुढील १४ दिवस त्याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

- Advertisement -

या क्रमाकांवर साधा संपर्क –

दरम्यान , राज्यात नव्याने शुक्रवारी तीन जणांना प्रतिबंधात्मक उपायांसाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या १२ जण निरीक्षणाखाली आहेत. संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांच्या नवीन मध्यवर्ती इमारतीमधील कार्यालयात करोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक ०२० – २६१२७३९४ असा आहे. करोना संदर्भात नागरिकांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक १०४ उपलब्ध करण्यात आला आहे. करोना संदर्भातील मार्गदर्शक सूचना आणि आरोग्य शिक्षण विषयक साहित्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -