घरCORONA UPDATEराज्यात आज ५३१८ नव्या रुग्णांची नोंद; ४४३० रुग्ण बरे होऊन घरी परतले

राज्यात आज ५३१८ नव्या रुग्णांची नोंद; ४४३० रुग्ण बरे होऊन घरी परतले

Subscribe

आज राज्यात ५३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज १६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ८६ मृत्यू हे मागिल ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मागिल कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ८४,२४५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९४ % एवढे आहे.आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ८,९६,८७४ नमुन्यांपैकी १,५९,१३३ (१७.७४ टक्के) नमनुे पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६५,१६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ५३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णाांची एकूण संख्या १,५९,१३३ झाली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -