घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईत आज १ हजार ४६० नव्या रुग्णांची नोंद

Corona Live Update: मुंबईत आज १ हजार ४६० नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

मुंबईत आज १ हजार ४६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४१ मृत्यू झाले आहेत. मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ७३ हजार ७४७ वर पोहचला आहे.


आज राज्यात ५३१८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १६७ मृत्यूंची नोंद झाली आहे. ४४३० रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. सविस्तर वाचा

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत केंद्रीय पथक दाखल झाले आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली पथक मुंबईतील दौऱ्यावर आले आहे. गोरेगावमध्ये नेस्को कोविड सेंटरमध्ये पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे. या पथकासोबत मनप आयुक्त इकबाल चहल देखील आहेत. सविस्तर वाचा 


देशातील कोरोना रुग्णांचा रिकवह्री रेट ५८ टक्के झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. तसेच सध्या देशात तीन लाख रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत. तर देशात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा ३ टक्के आहे, असे हर्षवर्धन यांनी सांगितले. सविस्तर वाचा 

- Advertisement -


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाल्याचं समोर येत आहे. माहितीनुसार घरकाम करणाऱ्यासह आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. सविस्तर वाचा


पुण्यात एका रात्रीत तब्बल २११ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ११ हजार २३८वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत ६७४ जणांचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी २०१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये १२५ मनपा हद्दीतील आणि ७६ रुग्ण ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४ हजार ७२३वर पोहोचला आहे. सविस्तर वाचा 


देशात २४ तासांत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मागील २४ तासांत देशात १८ हजार ५५२ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून ३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५ लाख ८ हजार ९५३वर पोहोचला असून मृतांचा आकडा १५ हजार ६८५ झाला आहे. तसेच सध्या १ लाख ९७ हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २ लाख ९५ हजार ८८१ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. सविस्तर वाचा 


जगभरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगात आतापर्यंत ९९ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी ४ लाख ९६ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ५३ लाख ५७ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १ लाख ५२ हजार ७६५ इतका झाला आहे. यापैकी ७ हजार १०६ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -