घरCORONA UPDATEधोका वाढला! औरंगाबादमध्ये आढळले नवे ३२ रुग्ण, बाधितांचा आकडा २०९ वर

धोका वाढला! औरंगाबादमध्ये आढळले नवे ३२ रुग्ण, बाधितांचा आकडा २०९ वर

Subscribe

औरंगाबादमध्ये आज ३२ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आकडा २०० पार गेला आहे.

कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये आणखी ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा २०९ वर पोहोचला असल्याची माहिती घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कननबाला येळीकर यांनी दिली आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोरोनाबाधितांची संख्या २०० पार

औरंगाबाद शहरात आज, शुक्रवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत जवळपास २९२ जणांचे लाळेचे नमुने तपासणी करता पाठवण्यात आले होते. मात्र, त्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, सायंकाळी ७ वाजता तब्बल ३२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळळून आले. त्यामुळे औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता २०९ वर पोहोचली आहे.

- Advertisement -

औरंगाबादमध्ये आढळलेले ३२ जणांपैकी १८ जण हे संजयनगर मुकुंदवाडी येथील आहेत. तर नूर कॉलनी येथील ३, वडगाव कोल्हाटी येथील १, असेफिया कॉलनी येथील ३, भडकल गेट येथील १, गुलाबवडी पदमपुरा येथील २, सिटी चौक येथील १, महमूदपुरा येथील १ आणि भीमनगर येथील २ जणांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

उपचार घेतलेले रुग्ण

सध्या औरंगाबादमध्ये १७७ जण उपचार घेत असून २४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता औरंगाबादचा आकडा २०० पार गेला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्र दिनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट; राज्यातील सर्वांवर होणार मोफत उपचार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -