घरCORONA UPDATEPune Lockdown- प्रतिबंधित क्षेत्रातील अतिरिक्त निर्बंध मागे, किराणा दुकाने उघडता येणार!

Pune Lockdown- प्रतिबंधित क्षेत्रातील अतिरिक्त निर्बंध मागे, किराणा दुकाने उघडता येणार!

Subscribe

पुण्यात १२ हजार ९७८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ३३ हजारांपेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. अनेक नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

पुण्यात १० पोलिस ठाण्यांच्या हद्दीत किराणामालाची दुकाने बंद राहणार होती. मात्र हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती असे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली. या आधी कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सकाळी १० ते १२ या वेळेतही दुकाने बंद राहणार होती. मात्र आता ही दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या क्षेत्रात बंद होती दुकाने

समर्थ, खडक, फरासखाना,कोंढवा, स्वारगेट, बंडगार्डन, दत्तवाडी, येरवडा, खडकी व वानवडी पोलिस ठाण्यांच्या भागात कोरोनाचा प्रार्दुर्भाव वाढत असल्यामुळे दोन दिवस अतिरिक्त निर्बंध घालण्यात आले होते. या भागात दूधाची दुकाने वगळता कोणतीही दुकानं सुरू करण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. मात्र आता हा निर्णय मागे घेण्.त आला आहे.

- Advertisement -

आता या पोलिस ठाण्याच्या हद्दीत या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील, तर इतर क्षेत्रात १० ते दुपारी दोनपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत.

पुण्यात १२ हजार ९७८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ३३ हजारांपेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. अनेक नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. ज्यांची उत्तरे समाधानकारक नसतील, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. ज्या भागात नियमांचे पालन योग्य पद्धतीने होत नाही, अशा भागात गस्त वाढविण्यात आली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – मॉर्निंग वॉकला गेलेल्या पुणेकरांचा खास पुणेरी अपमान!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -