घरक्राइमराजकारण्यांसोबत गुंडांची फोटो सीरिज; गुंडाराज आल्याचा विरोधकांमध्ये सूर

राजकारण्यांसोबत गुंडांची फोटो सीरिज; गुंडाराज आल्याचा विरोधकांमध्ये सूर

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या काही फोटोंची चर्चा होते आहेत. या चर्चेचं कारण म्हणजे जे फोटो व्हायरल होत आहेत, त्या फोटोमध्ये कुख्यात गुंड आहेत. या फोटोंमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरूवात केली असून राज्यात गुंडाराज आलं का? असा सावलही उपस्थित करत आहेत.

“तो राजकारणी आहे. त्याचे मोठ्या लोकांसोबत संबंध असणार…” असे अनेकदा सर्वसामान्य लोकांच्या चर्चेत ऐकायला मिळते. विशेष म्हणजे अशा राजकारणांसोबत फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्यासाठी बऱ्याच जणांची गर्दी संबंधित राजकारण्याच्या घराबाहेर अथवा कार्यालयाबाहेर असते. सध्या असेच काहीसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोंमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पूत्र पार्थ पवार आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. कारण हे दुसरे तिसरे कोणी नसून कुख्यात गुंड आहेत. त्यामुळे राज्यातील राज्यकारण्यांची गुंडांसोबत फोटो सीरिज सुरू असून राज्यात गुंडाराज आला का? असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत. (criminals photos with maharashtra politicians sanjay raut eknath shinde ajit pawar vvp96)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांचा ४ जानेवारीला वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र या गर्दीतील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कुख्यात गुंड हेमंत दाभेकर दिसत आहे. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकरने वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. याबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’द्वारे माहिती दिली.

- Advertisement -

कोण आहे गुंड हेमंत दाभेकर?

कुख्यात गुंड हेमंत दाभेकर हा शरद मोहोळ याच्या गुन्ह्यात साथीदार आहे. गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहळ सोबत हेमंत दाभेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हेमंत दाभेकर हा जामिनावर बाहेर असून, शरद मोहोळ यांचा अत्यंत जवळचा व्यक्ती मानला जातो.

यानंतर पुण्यातील गुंड निलेश घायवळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो समोर आला आहे. संजय राऊत यांनी हा फोटो ट्वीट केला आहे. हा फोटो ट्वीट करत, महाराष्ट्रात गुंडा राज…, गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य’ असे म्हणत सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -

कोण आहे गुंड निलेश घायवळ?

गुंड निलेश घायवळ हा पुण्यात गॅंगस्टर म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे 14 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे या सारखे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. खून, खूनाचा प्रयत्न असेही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. घायवळ हा टोळी करून गुन्हे करत असल्याने पुणे पोलिसांनी 2021 मध्ये त्याच्याविरोधात मोक्काची कारवाई केली होती. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी एक वर्षासाठी येरवडा कारागृहात घायवळला स्थानबद्ध केले होते.

हेही वाचा – Sanjay Raut : बाळराजांच्या वाढदिवसाला गुंडांची फौज, राऊतांनी साधला श्रीकांत शिंदेंवर निशाणा

कोण आहे गजानन मारणे?

काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतल्याचे समोर आले होते. गजा उर्फ गजानन मारणे हा मुळशी तालुक्यातील एका छोट्या गावात जन्मलेला तरुण आहे. पुण्यातील कोथरूड परिसरातील शास्त्रीनगर परिसरात राहण्यासाठी आल्यानंतर गजा मारणे गुन्हेगारीकडे वळला. त्यानंतर आतापर्यंत त्याची गुन्हेगारी सुरूच आहे. पुण्यातील घायवळ गँग आणि मारणे गँग यातील वर्चस्वाचा वाद पुण्यात एकेकाळी प्रचंड गाजला. त्यानंतर अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा मारणे याला अटक झाली. तो ३ वर्ष येरवडा कारागृहात होता. तो आता मारणे टोळीचा म्होरक्या असून आजवर या टोळीवर 23 होऊन अधिक गुन्हे दाखल आहेत. तर गजा मारणेवर सहा पेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला २० कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पिंपरी-चिंचवड मधील अट्टल गुन्हेगार गेल्याचा फोटो समोर आला. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. असिफ दाढी याने अजित पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. तो एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी अजित पवार यांच्याकडे गेला असल्याची माहिती मिळत आहे.

कोण आहे असिफ दाढी?

असिफ दाढी याच्यावर सन 1988 मध्ये मारहाणीचा पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर लगेच मारहाणीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला. सन 1996 मध्ये त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. सन 2002 मध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल. सन 2004 मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा दुसरा गुन्हा दाखल झाला. सन 2007 मध्ये खुनासाठी अपहरण आणि खून असा गुन्हा दाखल आहे. सन 2009 आणि सन 2011 मध्ये शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. तर 2021 साली त्याच्यावर अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला त्याच्या घरातून शस्त्रासह अटक केली होती.


हेही वाचा – Sanjay Raut : मुख्यमंत्री शिंदेंसोबत गुंड निलेश घायवळ: संजय राऊतांकडून फोटो ट्वीट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -