घरमहाराष्ट्रआपण राज्य अधोगतीकडे नेत आहात, राष्ट्रवादीची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात, राष्ट्रवादीची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Subscribe
मुख्यमंत्री एखनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन होऊन एक महिन्या पेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. दरम्यान सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला आहे. तर दुसरीकडे नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी  नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
दोन ते तीन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार? –
नवे शिंदे -भाजप सराक सत्तेत येऊन महिना झाला आहे. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांमध्ये एकमत होत नसल्यानेच मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा दावा करण्यात येत आहे. तर येत्या दोन ते तीन दिवसात निश्चित मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचा कयास बांधला जात आहे. याबाबत अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे.
अमोल मिटकरीयांचे ट्वीट –
शिंदे सरकारला ३५ दिवस पूर्ण. राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा कॅबिनेट विना एकहाती सरकार. या खेळात मात्र सामान्य जनता होरपळत चालली आहे. जे चालवलय ते बरे नाही शिंदे साहेब. फडणवीसांच्या नादाला लागुन आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात, अशी टीका करणारे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -