१०० कोटींच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसांची वाट पाहतोय – नवाब मलिक

nawab malik

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी क्रूझ पार्टी प्रकरणात गौप्यस्फोट करत भाजपच्या युवा मोर्चाचे पदाधिकारी मोहित कंबोज यांच्या मेव्हण्याला सोडण्यात आल्याचा आरोप केला. यानंतर कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा जाहीर केलं होतं. यावर आता नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देताना १०० कोटींच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसांची वाट पाहतोय, असं म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

“काही लोकं मला १०० कोटींच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा पाठवणार आहे. मी वाट पाहत आहे. कधी मला नोटीस प्राप्त होते. माझी १०० कोटींची परिस्थिती आहे. कारण भाजपचे प्रत्येक नेते मला १०० कोटींच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसांची धमकी देत आहेत. तेवढी तर माझी ऐपत नाही. पण बऱ्याच कंपन्यांची नैसर्गिक किंमत नसते पण त्यांची ब्रँड व्हॅल्यू असते. मला वाचतं त्यांनी माझी ब्रँड व्हॅल्यू १०० कोटी ठरवली. त्यांचे मी आभार मानतो. नोटीसा येत्रद्या. त्यांना उत्तर देऊ,” असं मलिक म्हणाले

“मोहित कंबोज काल मला कचरावाला,भंगारवाला बोलले. मला अभिमान आहे. माझे वडील, मी स्वत:, माझ्या घरातली लोकं हे. भंगाराचा धंदा करत आहेत. कायदेशीर धंदा करणं त्याचा मला अभिमान आहे. मी कुठल्याही मार्केटला बुडवलं नाही. सोन्याची तस्करी केली नाही. सोन्याच्या बाजारात बनावटपणा केला नाही. मी कधीही कुठल्याही बँकेचे पैसे बुडवले नाहीत. ज्यांच्यावर सीबीआयच्या धाडी पडल्या आहेत. ६७ कोटी बुडवले आहेत ते माझं, माझ्या कुटुंबाचा धंदा काढतायत. हो आम्ही भंगाराचा धंदा करतो. पण आम्ही सोन्याच्या नावाने कुणालीह लूटत नाही नाही बँकेचे पैसे बुडवत नाही,” असा पलटवार नवाब मलिक यांनी केला. तसंच पुढे बोलताना त्यांनी भाजपमध्ये सक्रीय नाही असं त्यांनी सांगितलं कारण सीबीआयच्या धाडी त्यांच्या घरावर पडलेल्या आहेत, बँकेला बुडवलं आहे. त्यामुळे ते आजच्या घडीला गायब आहेत,” असं मलिक म्हणाले.