घरताज्या घडामोडीसिलेंडर महागल्यामुळे खेड्यात चुली पेटल्या

सिलेंडर महागल्यामुळे खेड्यात चुली पेटल्या

Subscribe

दिवसेंदिवस गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीमुळे खेड्यापाड्यातील महिलांना चुलीवरच पुन्हा यावे लागले आहे.

चुलीच्या धुराचा त्रास महिलांना होऊ नये, यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून खेडोपाडी गॅसजोडण्या मिळाल्या. परंतु दिवसेंदिवस गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीमुळे खेड्यापाड्यातील महिलांना चुलीवरच पुन्हा यावे लागले आहे. असे चित्र गडचिरोलीसह बऱ्याच खेड्यामध्ये दिसून आले आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला सिलेंडरचा वापर फक्त चहा बनविण्यापुरता करीत आहेत. बाकीचे जेवण हे चुलीवर करत आहेत. तसेच खेड्यातील महिलांना जळावू लाकडासाठी जंगलात वणवण भटकावे लागत आहे.

उज्ज्वला गॅस योजनेतून अनेक घरांमध्ये गॅस पोहोचला होता. मात्र, सिलेंडर लवकर न मिळणे आणि त्यांच्या वाढत्या किंमती पाहता तो न वापरण्याकडे ग्रामस्थांचा कल राहिला. तसेच केरोसिनवरही बंदी आणल्याने महिलांना पुन्हा गोवऱ्या व सरपणाकडे वळावे लागले आहे. जंगल परिसरात राहणाऱ्या कुटुंबांना तेथील वन्यपशूंचा नेहमीच धोका असतो. अशात सरपण गोळा करायला जंगलात गेल्यावर वन्यपशूच्या तावडीत सापडून ठार झालेल्या नागरिकांच्या अनेक कहाण्या ऐकिवात येतात. सिलेंडरचे आकाशाला भिडणारे दर पाहता, घरचे बजेट सांभाळण्याकरिता महिला गोवऱ्या व सरपणावरच अवलंबून राहू लागल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -