घरताज्या घडामोडीकरोना पॉझिटिव्हचा एअरपोर्ट ते कल्याण व्हाया सोलापूर प्रवास, पण 'त्या' टॅक्सी ड्रायव्हरलाच...

करोना पॉझिटिव्हचा एअरपोर्ट ते कल्याण व्हाया सोलापूर प्रवास, पण ‘त्या’ टॅक्सी ड्रायव्हरलाच आले ५१ कॉल्स

Subscribe

कल्याण येथील करोना पॉझिटीव्ह व्यक्तीला कल्याणमध्ये सोडलेल्या एका टॅक्सी चालकाचा मोबाईल आता खणाणू लागला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या एका चुकीमुळे याचा फटका टॅक्सी चालकाला बसला आहे. आरोग्य वैद्यकीय विभागाने जाहीर केलेल्या पत्रामुळे एका टॅक्सी चालकाला नंबर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत ५० हून अधिक कॉल्स या टॅक्सी चालकाला आले आहेत. मुंबईत ट्रॅव्हल एजन्सीसाठी टॅक्सी चालवणारा हा टॅक्सी चालक आहे. ज्या व्यक्तीने टॅक्सी सेवेचा वापर केला होता त्या व्यक्तीनेच या टॅक्सी चालकाचा मोबाईल नंबर हा आरोग्य विभागाला दिला होता. त्यामुळेच हा क्रमांक आता व्हायरल झाला आहे.

taxi
आरोग्य विभागामार्फत व्हायरल पत्र

गेल्या आठवड्यात ६ मार्चला मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर कल्याणच्या या व्यक्तीने टॅक्सी घेऊन थेट कल्याण गाठले. पण त्याहून कहर म्हणजे या करोना पॉझिटीव्ह रूग्णाने सिद्धेश्वर एक्सप्रेसने कल्याण ते सोलापूर असा प्रवास केला. आणखी गंभीर म्हणजे या रूग्णाने सोलापूरातील मोहळ तालुक्यातील श्रीराम मंगल कार्यालयात ७ मार्चला लग्न सभारंभासाठीही हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा एकदा प्रवास करत सिद्धेश्वर एक्सप्रेसने पुन्हा एकदा कल्याण गाठले. आता आरोग्य विभागासमोर या सगळ्या प्रवास क्रमामुळे मोठा पेच प्रसंग उभा राहिला आहे. या सगळ्या प्रवासातील व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे का याची सध्या चाचपणी करण्यात आरोग्य विभाग गुंतला आहे. या करोना पॉझिटीव्ह प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -