घरताज्या घडामोडीतरीही आम्ही दहीहंडी फोडणारच, राम कदम यांचा इशारा

तरीही आम्ही दहीहंडी फोडणारच, राम कदम यांचा इशारा

Subscribe

स्वत:घरात बसून हिंदूनी काय करावे आणि काय करु नये या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही

कोरोनामुळे (Covid-19) मागील वर्षी दहीहंडी उत्सव (Dahihandi Festival) रद्द करण्यात आला. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पाश्वभूमीवर दहीहंडी उत्सवासाठी परवानगी नाकारली. यावरुन राजकारण तापले असून भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. दहीहंडी उत्सव अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला असताना ‘महाराष्ट्र सरकारने नियम आखून परवानगी दिली तर स्वागत आणि नाही दिली तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणाचं’, असा इशारा भाजप आमदार राम कदम यांनी सरकारला दिला आहे. (Dahihandi Festival will be celeberated say ram kadam )

‘हिंदू धर्माचे सण आम्ही साजरे करणारच. स्वत:घरात बसून हिंदूनी काय करावे आणि काय करु नये या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही’, असा टोला राम कदम यांनी सरकारला लगावला आहे.

- Advertisement -


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी उत्सावाच्या आयोजनाची परवानगी नाकारली. त्यानंतर राम कदम यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका करत आयोजक नात्याने घाटकोपर येथील दहीहंडी उत्सव साजरा करणार. सरकारने कितीही फतवा काढला कितीही रोखले तरीही दहीहंडी उत्सव साजरा होणार,असा इशारा दिला होता.

‘बियर बार दारुचे ठेले सुरू करता. त्यांच्यासाठी नियम बनवा. तसे नियम बनवणार असाल तर त्या नियमांचे स्वागत करू. पण नियम बनवणार नसाल आणि एसी बंगल्यात बसून दहीहंडी साजरी करू नका असे सांगाल तर हिंदू बांधव ऐकणार नाही. तो दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणार, असे देखील राम कदम यांनी म्हटले होते.

- Advertisement -

हेही वाचा – सरकारनं कुठलाही फतवा काढला तरी घाटकोपरमध्ये दहीहंडी साजरी होणार – राम कदम

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -