घरताज्या घडामोडीमध्य रेल्वेची दैनिक अनारक्षित रेल्वे सेवा पूर्ववत, पहा संपूर्ण वेळापत्रक

मध्य रेल्वेची दैनिक अनारक्षित रेल्वे सेवा पूर्ववत, पहा संपूर्ण वेळापत्रक

Subscribe

रेल्वे मंत्रालयाने पुणे -सोलापूर, सोलापूर- वाडी, दौंड/पुणे- निजामाबाद, कुर्डूवाडी -मिरज, पुणे- कोल्हापूर, पुणे- दौंड आणि निजामाबाद- पंढरपूर दरम्यान पुढील सुचनेपर्यंत खालील ट्रेन सेवा अनारक्षित दैनिक म्हणून पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व विशेष DEMU ट्रेन १० डब्ब्यांसह चालविण्यात येतील. तर रेल्वे मंत्रालयाने भुसावळ -खंडवा, बडनेरा- नरखेड, नागपूर – आमला, आमला- इटारसी, अमरावती -बडनेरा आणि आमला – छिंदवाडा दरम्यान पुढील सुचनेपर्यंत दैनिक अनारक्षित रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व अनारक्षित मेमू ८ डब्ब्यांसह चालविण्यात येतील.

पुणे – सोलापूर

ट्रेन क्रमांक 01421 अनारक्षित१५ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत पुणे येथून दररोज सकाळी ०८.३० वाजता सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी १५.३५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01422 अनारक्षित १६नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत सोलापूर येथून दररोज २३.२० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०६.०० वाजता पोहोचेल.

- Advertisement -

ही गाडी हडपसर, लोणी, उरुळी, केडगाव, दौंड, मलठन, भिगवण, जिंती रोड, पारेवाडी, वाशिंबे, जेऊर, भालवणी, केम, कुर्डुवाडी जं., वडसिंगे, माढा, वाकाव, अनगर, मलिकपेठ, मोहोळ, मुंढेवाडी, पाकणी या ठिकाणी थांबेल.

सोलापूर -वाडी

ट्रेन क्रमांक 01381अनारक्षित १६ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत सोलापूर येथून दररोज ००.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी वाडी येथे ०४.०५ वाजता पोहोचेल. हा गाडी अक्कलकोट रोड, दुधनी, कुलाली, गाणगापूर रोड, सावलगि, कलबुरगि, हिरेनंदुरू, मारतूर आणि शहाबाद या ठिकाणी थांबेल.
ट्रेन क्रमांक 01382 अनारक्षित १६नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत वाडी येथून दररोज ०६.४५ वाजता सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी ०९.५५ वाजता पोहोचेल. ही शहाबाद, मारतूर, हिरेनंदुरू, कलबुरगि, बबलाद, सावलगी, हुन्सिहडगिल, गाणगापूर रोड, गौडगाव, कुलाली, दुधनी, बोरोटी, नागणसूर, अक्कलकोट रोड, तिलाटी, होटगी जं. आणि टिकेकरवाडी या ठिकाणी थांबेल.

- Advertisement -

दौंड – निजामाबाद

ट्रेन क्रमांक 01409 अनारक्षित १५ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत दौंड येथून दररोज १६.४५ वाजता सुटेल आणि निजामाबाद येथे दुसर्‍या दिवशी १०.४० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01410 अनारक्षित दि. १७ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत निजामाबाद येथून दररोज २३.४० वाजता सुटेल आणि पुणे दुसऱ्या दिवशी १९.०० वाजता पोहोचेल. ही गाडी उरुळी (फक्त 01410 साठी), दौंड, श्रीगोंदा रोड, विसापूर, अहमदनगर, राहुरी, बेलापूर, पुणतांबा, कोपरगाव, येवला, अंकाई, मनमाड, नगरसोल, रोटेगाव (फक्त 01410 साठी), करंजगाव (फक्त 01410 साठी), लासूर (फक्त 01410 साठी), औरंगाबाद, मुकुंदवाडी (फक्त 01410 साठी), बदनापूर, जालना, रांजणी (फक्त 01410 साठी), परडगाव (फक्त 01410 साठी), परतूर, सेलू, मनवत रोड (फक्त 01410 साठी), परभणी जं., पूर्णा जं., नांदेड, मुदखेड, उमरी, कारखेली, धर्माबाद आणि बसर या ठिकाणी थांबेल.

कुर्डुवाडी – मिरज

ट्रेन क्रमांक 01545 अनारक्षित दि. १५नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत कुर्डुवाडी जंक्शन येथून दररोज १०.५५ वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी १५.१० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01546 अनारक्षित दि. १५नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत मिरज येथून दररोज ०६.२५ वाजता सुटेल आणि कुर्डुवाडी जंक्शन येथे त्याच दिवशी १०.१५ वाजता पोहोचेल.

या गाड्या मोडनिंब, पंढरपूर, सांगोला, वासूद, जावळे, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, लंगरपेठ, कवठे महांकाळ, सलगरे, बेळंकी आणि आरग या ठिकाणी थांबतील.

पुणे – सातारा

ट्रेन क्रमांक 01539 अनारक्षित १५नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत पुणे जंक्शन येथून दररोज १८.३० वाजता सुटेल आणि सातारा येथे त्याच दिवशी २२.४० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01540 अनारक्षित १७ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत सातारा येथून ०६.१५ वाजता सुटेल आणि पुणे जंक्शन येथे त्याच दिवशी १०.२५ वाजता पोहोचेल.

या गाड्या सासवड रोड, फुरसुंगी, आळंदी, शिंदवणे, आंबळे, राजेवाडी, जेजुरी, दौंडज, वाल्हा, निरा, लोणंद, साल्पा, अदारकी, वाठार, पळशी आणि जरंडेश्वर या ठिकाणी थांबतील.

सातारा – कोल्हापूर

ट्रेन क्रमांक 01541 अनारक्षित १६ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत सातारा येथून दररोज ०५.३० वाजता सुटेल आणि कोल्हापूर येथे त्याच दिवशी ०९.५५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01542 अनारक्षित दि. १६ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत कोल्हापूर येथून दररोज १६.५५ वाजता सुटेल आणि सातारा येथे त्याच दिवशी २१.५० वाजता पोहोचेल.

ही गाडी कोरेगाव, रहिमतपूर, तारगाव, मसूर, शिरवडे, कराड, शेणोली, भवानी नगर, ताकारी, किर्लोस्करवाडी, आमनपूर, भिलावडी, नांद्रे, माधवनगर, सांगली, विश्रामबाग, मिरज जंक्शन, जयसिंगपूर, निंशिरगाव टांडलगे, हातकणंगले, रूकडी आणि वाळिवडे या ठिकाणी थांबेल.

पुणे – दौंड (वन वे)

ट्रेन क्रमांक 01525 अनारक्षित १५ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत पुणे जं. येथून दररोज ०९.४० वाजता सुटेल आणि दौंड येथे त्याच दिवशी ११.१० वाजता पोहोचेल. ही गाडी हडपसर, मांजरी बुद्रुक, लोणी, उरुळी, येवत, खुटबाव, केडगाव आणि पाटस या ठिकाणी थांबेल.

निजामाबाद- पंढरपूर

ट्रेन क्रमांक 01413 अनारक्षित १६ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत निजामाबाद येथून दररोज १३.२५ वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०४.३० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01414 अनारक्षित १७नोव्हेंबर  २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत पंढरपूर येथून दररोज ०५.३० वाजता सुटेल आणि निजामाबाद येथे त्याच दिवशी २३.०५ वाजता पोहोचेल.

ही गाडी बासर, धर्माबाद, कारखेली, उमरी, मुदखेड, मुगत, पाथरड, नांदेड, वानेगाव, लिंबगाव, चुडावा, पूर्णा जं., मिरखळ, पिंगळी, परभणी जं., सांगणापूर, पोखर्णी नरसिंहा, धोंडी, गंगाखेड, वडगाव निला, उखळी, परळी वैजनाथ, घाटनांदूर, मुर्ती, पानगाव, कारेपूर, जानवल, वडवळ नागनाथ, लातूर रोड, लातूर, हरंगुळ, औसा रोड, ढोकी, येडशी, उस्मानाबाद, पांगरी, बारशी टाऊन, शेंद्री, कुर्डुवाडी जंक्शन, आणि मोडनिंब या ठिकाणी थांबेल.

भुसावळ- इटारसी

ट्रेन क्रमांक 01183 अनारक्षित १५ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत भुसावळ येथून दररोज २०.४० वाजता सुटेल आणि इटारसी येथे दुसर्‍या दिवशी ०६.०५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01184 अनारक्षित  १९नोव्हेंबर.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत इटारसी येथून दररोज १९.३० वाजता सुटेल आणि भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी ०४.२५ वाजता पोहोचेल. ही गाडी सावदा, निंभोरा, रावेर, वाघोडा, बुर्‍हाणपूर, नेपानगर, सागफाटा, डोंगरगाव, बारगाव गुजर, खंडवा, माथेळा, तळवड्या, सुरगाव बंजारी, चरखेरा खुर्द, चनेर, बारूड, डागर खेडी, खिरकीया, भिरिंगी, मासनगांव, पलसनेर, हरदा, चरखेरा, तिमरनी, पगडल, भैरोनपूर, बानापुरा, धरमकुंडी आणि दुलारिया या ठिकाणी थांबेल.

भुसावळ-बडनेरा

ट्रेन क्रमांक 01365 अनारक्षित १५ नोव्हेंबर२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत भुसावळ येथून दररोज ०६.३० वाजता सुटेल आणि बडनेरा येथे त्याच दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01366 अनारक्षित १७ नोव्हेंबर२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत बडनेरा येथून दररोज १३.३० वाजता सुटेल आणि भुसावळ येथे त्याच दिवशी १८.५५ वाजता पोहोचेल. ही गाडी वरणगाव, आचेगाव, बोदवड, कोल्हाडी, खामखेड, मलकापूर, वडोदा, बिस्वा ब्रिज, खुमगाव बुर्ती, नंदुरा, जलंब, शेगाव, श्रीक्षेत्र नागझरी, पारस, गायगाव, अकोला, येउलखेड, बोरगाव, काटेपूर्णा, मुर्तजापूर, माना, कुरम आणि टाकळी (फक्त 01366 साठी) या ठिकाणी थांबेल.

 बडनेरा-नरखेड

ट्रेन क्रमांक 01367 अनारक्षित १५ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत बडनेरा येथून दररोज १३.०५ वाजता सुटेल आणि नरखेड येथे त्याच दिवशी १६.१५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्र. 01368 अनारक्षित  १५ नोव्हेंबर२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत दररोज १७.०० वाजता नरखेड येथून सुटेल आणि बडनेरा येथे त्याच दिवशी २०.३५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01369 अनारक्षित  १६ नोव्हेंबर२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत बडनेरा येथून दररोज ०५.५० वाजता सुटेल आणि नरखेड येथे त्याच दिवशी रात्री ०८.५५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01370 अनारक्षित  १६नोव्हेंबर२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत नरखेड येथून दररोज ०९.३० वाजता सुटेल आणि बडनेरा येथे १३.०० वाजता पोहोचेल. ही गाडी नवीन अमरावती, वळगाव, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड ऑरेंज सिटी, पुसला आणि मोवाड या ठिकाणी थांबेल.

नागपूर- आमला

ट्रेन क्रमांक 01323 अनारक्षित १८ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत नागपूर येथून दररोज १८.०५ वाजता सुटेल आणि आमला येथे त्याच दिवशी २२.२० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01324 अनारक्षित १८ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत आमला येथून दररोज ०४.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल. ही गाडी गोधनी, भरतवाडा, कळमेश्वर, कोहली, सोनखांब, मेटपांजरा, काटोल, कळंभा, तिनखेडा, नरखेड, दारीमेटा (फक्त 01323 साठी), पांढुर्णा, तीगांव, घुडनखापा (फक्त 01323 साठी), चिचोंडा, हतनापुर, मुलताई आणि जौलखैरा या ठिकाणी थांबेल.

 आमला-इटारसी

ट्रेन क्रमांक 01317 अनारक्षित १९ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत आमला येथून दररोज ०८.०० वाजता सुटेल आणि इटारसी येथे त्याच दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01318 अनारक्षित १६ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत इटारसी येथून १२.२० वाजता सुटेल आणि आमला येथे त्याच दिवशी १६.०० वाजता पोहोचेल. ही गाडी बरसाली, मलकापूर रोड, बैतूल, मरमझिरी, घोराडोंगरी, बरबतपूर, ढोढरामोहर, काला आखर, टाकू आणि किरतगढ़ या ठिकाणी थांबेल.

अमरावती- वर्धा

ट्रेन क्रमांक 01371 अनारक्षित १६ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत अमरावती येथून दररोज १५.१५ वाजता सुटेल आणि वर्धा येथे त्याच दिवशी १७.१० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01372 अनारक्षित  १७ नोव्हेंबर२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत वर्धा येथून दररोज १०.०० वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १२.१० वाजता पोहोचेल. ही गाडी टिमटाळा, मालखेड, चांदूर, धामणगाव, तळणी, पुलगाव, कवठा आणि दहेगाव या ठिकाणी थांबेल.

आमला -छिंदवाडा

ट्रेन क्रमांक 01319 अनारक्षित १७ नोव्हेंबर२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत आमला येथून दररोज ०८.०० वाजता सुटेल आणि छिंदवाडा येथे त्याच दिवशी ११.१५ वाजता छिंदवाडा येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01320 अनारक्षित  १७ नोव्हेंबर२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत छिंदवाडा येथून १८.१५ वाजता सुटेल आणि आमला येथे त्याच दिवशी २१.२० वाजता पोहोचेल. ही गाडी जांबरा, बोरढाई, नवागाव, हिरदागढ, जुन्नारदेव, पालाचौरी, इकलेहरा आणि परासिया या ठिकाणी थांबेल.

बडनेरा-अमरावती

ट्रेन क्रमांक 01379 अनारक्षित १६ नोव्हेंबर२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत बडनेरा येथून दररोज १४.१० वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १४.३० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01380 अनारक्षित  १७ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत अमरावती येथून १३.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १३.२५ वाजता बडनेरा येथे पोहोचेल.

नियमित क्रमांकासह ट्रेन्स चालवण्यासाठी रेल्वे माहिती प्रणाली केंद्र (CRIS- Centre for Railway Information System) सिस्टम अपडेट करत आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे, एसओपी चे पालन करावे.


हेही वाचा – Mumbai Vaccination: कोविडमुक्त मुंबईच्या दिशेने एक पाऊल पुढे! १०० टक्के लोकांनी घेतला पहिला डोस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -