घरताज्या घडामोडी'ठाकरे' सिनेमाचा दुसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, संजय राऊतांची घोषणा

‘ठाकरे’ सिनेमाचा दुसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, संजय राऊतांची घोषणा

Subscribe

महाराष्ट्रातील नाही तर देशभरातील जनतेने ठाकरे या सिनेमाला प्रचंड प्रतिसाद दिला होता.

हिंदू ह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ सिनेमा २०१९मध्ये प्रेक्षकांच्या भेटील आला होता. महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील जनतेने ठाकरे या सिनेमाला प्रचंड प्रतिसाद दिला होता. ठाकरे या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकीने बाळासाहेब ठाकरेंची मुख्य भूमिका साकारली होती. ठाकरे सिनेमाच्या समीक्षेचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते. आता पुन्हा एकदा ठाकरे सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ठाकरे सिनेमाचा दुसरा पार्ट येणार असल्याची माहिती शिवेसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संजय राऊतांनी ही माहिती दिली.

ठाकरे सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची घोषणा करताना राऊत यांनी म्हणाले, जेव्हा मला काही काम नसते तेव्हा मला सिनेमा पहायला आवडतो. मला नेहमी असे वाटत की ज्या विषयावर कोणीही सिनेमा तयार करते त्यावर आपण लिहावे, म्हणूनच मी ठाकरे हा सिनेमा तयार केला. बाळासाहेबांवर सिनेमा व्हावा अशी माझी मनापासून इच्छा होती आणि आम्ही तो बनवला. आता ठाकरे सिनेमाचा दुसरा पार्ट देखील बनवत आहोत असे राऊत म्हणाले.

- Advertisement -

ठाकरे सिनेमात बाळासाहेबांचा तरुणपणापासूनचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला होता. अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकी सिनेमात बाळासाहेबांच्या भूमिकेत होता. तर अमृता राव हिने माँ साहेबांची भूमिका निभावली होती. स्वत: संजय राऊत यांनी सिनेमाची निर्मिती केली होती तर अभिजीत पानसे यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. हिंदी मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. केवळ महाराष्ट्रातच नाही जगभरात ठाकरे हा सिनेमा पाहिला गेला. आता ठाकरे सिनेमाचा दुसरा पार्ट कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.


हेही वाचा – झी एंटरटेन्मेंटद्वारे ‘माइंड वॉर्स मुंबई डिबेट चॅम्पियनशिप २०२१’चे आयोजन करणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -