घरCORONA UPDATEMumbai Vaccination: कोविडमुक्त मुंबईच्या दिशेने एक पाऊल पुढे! १०० टक्के लोकांनी...

Mumbai Vaccination: कोविडमुक्त मुंबईच्या दिशेने एक पाऊल पुढे! १०० टक्के लोकांनी घेतला पहिला डोस

Subscribe

लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर लसीचा दुसरा डोस देखील घेऊन लसीकरण पूर्ण करावे

मुंबईत आज कोरोना विरोधी लसीकरणाचा एक टप्पा पूर्ण झाला. मुंबईतील १०० टक्के लोकांनी कोरोना विरोधी लसीचा पहिला डोस घेतल्याची माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली. मुंबईत कोरोना लसीच्या पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. शुक्रवार पर्यंत मुंबईत पहिला डोस घेतलेले ९९.९९ टक्के लोक होते. आज १०० टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. मुंबईत आज सकाळच्या सत्रात मुंबईने हा टप्पा गाठला. यात मुंबईतील सर्व शासकीय,महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत ९२ लाख ३९ हजार ९०२ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतल्याची माहिती कोविन या राष्ट्रीय लसीकरण संकेत स्थळावर करण्यात आली आहे.


मुंबईकरांनी लसीकरण मोहीमेला केलेल्या सहकार्यामुळे आणि दिलेल्या प्रतिसादामुळे लसीची पहिली मात्रा देण्याचे लक्षांक मुंबईने आज पूर्ण केले. लसीच्या पहिल्या मात्रेचे लक्षांक पूर्ण झाल्याने आता लसीच्या दुसऱ्या मात्रेचे लक्षांक देखील लवकरात लवकर गाठण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. मुंबईच्या लोकसंस्खेनुसार आणि पात्र नागरिकांची संख्या लक्षात घेऊन शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपापल्या क्षेत्रातील लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करुन देण्यात आले आहे.

- Advertisement -

मुंबईत कोरोना विरोधी लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर लसीचा दुसरा डोस देखील घेऊन लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

त्याचप्रमाणे दीड कोटी मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण झाल्याची नोंद १० नोव्हेंबर रोजी करण्यात आली. मुंबईत दीड कोटी लोकांनी कोरोना विरोधी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. दीड कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण करताच आता १०० कोटी लोकांनी लसीचा पहिला डोस घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण मोहिमेत आणखी एक मैलाचा टप्पा पार गाठल्याचे पालिकेने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Vaccination: मुंबईत दीड कोटी कोविड लसीकरण पूर्ण

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -