घरमहाराष्ट्ररस्त्यावर दूध ओतून आंदोलन करणे दुर्भाग्यपूर्ण - दुग्धविकास मंत्री सुनिल केदार

रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करणे दुर्भाग्यपूर्ण – दुग्धविकास मंत्री सुनिल केदार

Subscribe

दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांची आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. कोरोनाच्या लढाईत गोरगरिबांना दुध वाटप करा, असं आवाहनही त्यांनी केलं. रस्त्यावर दूध फेकून प्रश्न निकाली निघत नाहीत, असं देखील दुग्धविकास मंत्री सुनिल केदार म्हणाले. दूध दर प्रश्नावर मंत्रालयात दुपारी २ वाजता बैठक होणार आहे. आजची बैठक मी आंदोलन बघून घेतलेली नाही, असं सुनिल केदार यांनी स्पष्ट केलं.

यावेळी, दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी भाजपवर टीका केली आहे. ५ वर्षे सत्तेत असताना भाजपनं दूध दर प्रश्नावर काय केलं, असा सवाल सुनिल केदार यांनी केला. दूध दराबाबत केंद्र सरकारने हातभार लावाव, असं आवाहनही केदार यांनी केलं. शिवाय, आजची बैठक मी आंदोलन बघून घेतलेली नाही. तर दुध दराबाबत बैठक घेण्याचा निर्णय मी १६ जुलैला घेतला होता. दुध विकासासाठी राज्य सरकारने काय करायला हवं, हे जाणून घेण्यासाठी मी बैठक बोलवली होती. जे ३०-४० वर्षे काम करताहेत त्यांच्याकडून मी त्यांचे प्रश्न समजून घेणार आहे. त्यानंतर राज्य शासन म्हणून योग्य निर्णय घेणार आहे, असं दुग्धविकास मंत्री सुनिल केदार सांगितलं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -