Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Devendra Fadnavis : सचिन तेंडुलकरबाबत तरुणांना खूप आकर्षण, फडणवीसांनी केलं कौतुक

Devendra Fadnavis : सचिन तेंडुलकरबाबत तरुणांना खूप आकर्षण, फडणवीसांनी केलं कौतुक

Subscribe

प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)हे राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (Brand Ambassador) होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी दिली होती. त्यानुसार आज सचिन तेंडुलकर यांना स्वच्छ मुख अभियानाचा ‘स्माईल अँबॅसिडर’ म्हणून बनवण्यात आलं आहे. सचिन तेंडुलकर यांनीही ‘अँबॅसिडर’ होण्याचं मान्य केलं आहे. महाराष्ट्र शासनासोबत देखील त्यांनी करार केला आहे. हा करार पूर्णपणे निशुल्क आहे. तसेच सचिन तेंडुलकरांबाबत तरुणांना खूप आकर्षण असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी सचिन तेंडुलकर यांचं कौतुक केलं आहे.

जनजागृती होणं फार महत्त्वाचं

स्वच्छ मुख अभियानाच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियान या अतिशय महत्त्वाच्या उपक्रमाकरिता भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ‘अँबॅसिडर’ होण्याचं मान्य केलं. तसेच महाराष्ट्र शासनासोबत देखील त्यांनी करार केला आहे. हा करार पूर्णपणे निशुल्क आहे. ओरल हेल्थ हा एक महत्त्वाचा विषय आहे. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यास तेंडुलकर यांनी सहमती दर्शवली आहे. जनजागृती होणं फार महत्त्वाचं आहे. कारण ही जागृती सरकारच्या वतीनं कितीही सांगितलं तरी ती त्या प्रमाणात होऊ शकत नाही.

‘स्माईल अँबॅसिडर’ म्हणून योग्य व्यक्ती

- Advertisement -

ज्यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांसारख्या व्यक्ती जेव्हा याविषयावर बोलतात आणि अपील करतात. त्याचा एक प्रचंड परिणाम हा तुरुणाईवर होतो. आपल्याला कल्पना आहे की, सचिन तेंडुलकर यांच्याबाबत तरुणांना आकर्षण आणि प्रेम आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की, या स्वच्छ मुख्य अभियानाचे ते ‘स्माईल अँबॅसिडर’ म्हणून योग्य व्यक्ती आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तरुणाईवर मोठा परिणाम

- Advertisement -

अनेक कलाकार किंवा क्रिकेटपटूंकडून विविध प्रकारच्या जाहिराती केल्या जातात. जे अयोग्य आहेत, अशा प्रकारच्या जाहिराती देखील केल्या जातात. परंतु सचिन तेंडुलकर अशा प्रकारच्या कधीही जाहिराती करत नाहीत. कारण जेव्हा तुम्ही सेलिब्रिटी असता त्यावेळी एक जबाबदारी देखील असते आणि ती जबाबदारी तुम्ही खऱ्या अर्थानं पार पाडता. भारतरत्न आपल्या समाजाच्या प्रती जी काही भावना आहे. त्याच्या अनुरूप अशा प्रकारचं वर्तन करताना ते आपल्याला दिसतात. त्यामुळे त्यांच्यासारखा व्यक्ती अशा पद्धतीने जबाबदारी स्वीकारील. याचा तरुणाईवर मोठा परिणाम होईल, असंही फडणवीस म्हणाले.

स्मितहास्याने आपल्याला अनेक लढाई जिंकता येतात

एका स्मितहास्याने आपल्याला अनेक लढाई जिंकता येतात. पण एक स्मितहास्य हे लोकांना दाखवण्यासाठी असलं पाहीजे. नाहीतर वेगळ्याच प्रकारचं चित्र दिसलं की, लोकांना जिंकता येत नाही. त्यामुळे ऐकमेकांना स्मित हास्याने प्रसन्न करता यावं. यासाठी मौखिक आरोग्यबाबत जनजागृती करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मला विश्वास आहे की, जी स्क्रीनिंग आपण मोठ्या प्रमाणावर करत आहोत. त्यामधील अत्यावश्यक भाग आपण त्यामधून करणार आहोत. सचिन तेंडुलकर यांनी ही जबाबदारी देण्यात आल्यानंतर तरुणाईतील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल, असंही फडणवीस म्हणाले.

अलिकडच्या काळात गुटखा, सुपारी, सुगंधी सुपारी, तंबाखू अशा अनेक व्यसनांमुळे तरुणांना मुखाचे रोग आणि मुखाचा कर्करोग आढळून येत आहेत. त्यामुळे याबाबत जनजागृती करायची आहे. यासाठी भारतरत्न सचिन तेंडूलकर यांनी महाराष्ट्र शासनाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. सचिन तेंडुलकर यांनी महाराष्ट्र शासनासोबत पाच वर्षाकरीता निशुल्क करार केला आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने ओरल हेल्थबाबतची जनजागृती आणि ज्याठिकाणी शिबिर भरवायची आहेत. यासाठी लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सचिन तेंडुलकर मदत करणार आहेत.


हेही वाचा : Nana Patole : मोदी सरकारने 9 वर्षांत देश लुटला, भाजपाचा खरा चेहरा लोकांसमोर; नाना पटोलेंचा


 

- Advertisment -