घरताज्या घडामोडीNana Patole : मोदी सरकारने 9 वर्षांत देश लुटला, भाजपाचा खरा चेहरा...

Nana Patole : मोदी सरकारने 9 वर्षांत देश लुटला, भाजपाचा खरा चेहरा लोकांसमोर; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी सोमवारी रात्री उशीरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थावर भेट घेतली. या भेटीतील चर्चा गुलदस्त्यात आहे. परंतु, ठाकरे आणि फडणवीसांच्या या भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी सोमवारी रात्री उशीरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थावर भेट घेतली. या भेटीतील चर्चा गुलदस्त्यात आहे. परंतु, ठाकरे आणि फडणवीसांच्या या भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. ‘भाजपा सातत्याने मतविभाजनाचे राजकारण करत असून आधीही मतविभाजनाचे राजकारण करत होती. लोकांना आता भाजपाचा खरा चेहरा समजलेला आहे. नऊ वर्षांत त्यांनी देश लुटले. देशाची मालमत्ता भाजपाने विकली’, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर केली. (Nana Patole slams Modi government BJP maharashtra politics DCM Devendra Fadnavis MNS Raj Thackeray vvp96)

“भाजपा सातत्याने मतविभाजनाचे राजकारण करत असून आधीही मतविभाजनाचे राजकारण करत होती. त्यामुळे मतविभाजन (Division Of Vote) कसे होईल आणि त्यांना कसे सेफ केले जाईल, हा भाजपाचा (BJP) प्रयत्न असतो. त्यामुळे त्यावर फार काही बोलण्याची गरज नाही. लोकांना आता भाजपाचा खरा चेहरा समजलेला आहे. नऊ वर्षांत त्यांनी देश लुटले. देशाची मालमत्ता भाजपाने विकली. देशाच्या जनतेला जीएसटीसारखा (GST) सुलतानी कायदा आणून सर्वसामान्यांना लुटलं कसं? याबाबत त्यांनी व्याख्यान मांडलं असते तर बरे झाले असते. वस्तुस्थितीही लोकांच्या समोर आली असती”, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपावर केली.

- Advertisement -

सकाळी उटल्यापासू रात्री झोपेपर्यंत टॅक्स

“या जीएसटीमुळे नागरिकांनी सकाळी उटल्यापासू रात्री झोपेपर्यंत टॅक्स भरावा लागतो आहे. प्रत्येक ठिकाणी जीएसटी लावला जात आहे. लाईट, पंखा सगळ्यावर जीएसटी लावला जातो आहे. नागरिकांना 48 तास टॅक्सच्या बोजाखाली बसून राहावे लागते. त्यामुळे आम्ही या देशाचा विकास केला असे सागणाऱ्या भाजपाच्या पंतप्रधानांनी वस्तुस्थिती देशासमोर मांडावी. त्यांनीच 2000च्या नोटा आणल्या, त्यानंतर त्यांनीच त्या नोटा बंद केल्या”, असे सांगत नाना पटोले यांनी मग सुरूवातील समजलं नव्हतं का? असा सवालही भाजपासमोर उपस्थित केला.

(हेही वाचा – Balu Dhanorkar Political Journey : कोण आहेत काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर?)

- Advertisement -

“देशात सोनं नाही. नोटबंदीनंतर देशातील सर्व सोनं गहाण ठेवलं. ही सगळी वस्तुस्थिती देशासमोर ठेवली पाहिजे. महागाईमुळे लोकं त्रस्त आहेत. बेरोजगारी वाढली आहे. लोकांचे जीवन उद्वस्त झाले आहे. युवकांपासून सर्वांचेच नुकसाना झाले आहे. शेतकरी बरबाद झालेला आहे. ही 9 वर्षातील परिस्थिती भाजपाने मांडली असती, तर खऱ्या अर्थाने पंतप्रधानांना विश्वगुरू ही पदवी देता आली असती”, असा टोला नाना पटोले यांना लगावला.

(हेही वाचा – Shiv Sena UBT vs BJP : ज्याच्या खांद्यावर हात ठेवायचा त्याचा… ठाकरे गटाची भाजपावर टीका)

मी नेहमीच बाळू धानोरकरांच्या संपर्कात होतो – नाना पटोले

“आज काँग्रेसचे वलय वाढतंय, त्यामध्ये खासदार बाळू धानोरकर यांचा मोलाचा वाटा होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आणि त्यानंतर मी नेहमी त्यांच्या संपर्कात होतो. अनेक राजकीय आणि त्यांच्या कौटुंबिक विषयांवर माझी त्यांच्याशी चर्चा झाली. खरं तर, बाळू धानोरकर आम्हाला एवढ्या लवकर सोडून जातील ही धक्कादायक बाब आहे. पोटाची शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेनंतर झालेल्या या घडामोडी म्हणजे आम्हाला न समजणारे कोडं राहिले आहे. आमच्यासाठी ही वेदनादायी घटना आहे”, अशी भावना नाना पटोले यांनी खासदार बाळू धानोरकर यांच्याबद्दल व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -