घरताज्या घडामोडीराहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 'स' माहीत नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ‘स’ माहीत नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Subscribe

राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 'स' माहित नाही. लिहिलेले वाचतात. तीन-चार साल वो रहे...अरे या वेड्यांना एवढेही माहित नाही किती वर्षे ते तुरुंगात होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने आणि योग्य प्रकारे यांना उत्तर दिले पाहिजे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे.

राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ‘स’ माहित नाही. लिहिलेले वाचतात. तीन-चार साल वो रहे…अरे या वेड्यांना एवढेही माहित नाही किती वर्षे ते तुरुंगात होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने आणि योग्य प्रकारे यांना उत्तर दिले पाहिजे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत सावरकरांविरोधात विधान केलं आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. (DCM Devendra Fadnavis Slams on Rahul Gandhi criticism of freedom hero Savarkar)

कर्नाटकच्या तुमकूर या ठिकाणी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. यावेळी ते म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव या देशाचे नेते आहेत. ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वी कारावास भोगला आणि स्वातंत्र्यानंतर उपहासाचा कारावास भोगला. आजही ज्यांच्या विचारांना कारावासामध्ये सातत्याने टाकण्याचा प्रयत्न कॉंग्रेसच्या वतीने होतोय. रोज खोट बोलायचे. रोज चुकीचे सांगायचे आणि निर्लज्जपणे हे कॉग्रेस आणि कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी करत आहेत. त्यांना महाराष्ट्राची जनताच उत्तर देईल”

- Advertisement -

“स्वातंत्र्याच्या लढ्यातील कॉग्रेसच्या सर्व नेत्यांबद्द्ल मला आदर आहे. कुणी कमी केले असेल, कुणी अधिक केले असेल, पण माझा सवाल आहे की, ज्याप्रकारे अंदमानच्या कालकोठरीमध्ये दुहेरी काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना ११ वर्षे अत्याचार सहन केले. अशाप्रकारचे अत्याचार सहन करणारा एक नेता दाखवा. असे अत्याचार सहन करतानाही सावरकरांच्या मनामध्ये सातत्याने स्वातंत्र्य लक्ष्मीची पुजा करत होते. स्वातंत्र्य लक्ष्मीचच गीत गायल आणि तेच गीत लिहिलं आणि त्या ठिकाणी स्वत: मुकाबला करत असताना त्या अंदमानच्या कालकोठरीमधील कैद्यांना बंड करण्याचा धीर आणि हिंमत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिली”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

“राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स माहित नाही. लिहिलेले वाचतात. तीन-चार साल वो रहे…अरे या वेड्यांना एवढेही माहित नाही किती वर्षे ते तुरुंगात होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने आणि योग्य प्रकारे यांना उत्तर दिले पाहिजे. लवकरच त्यांना उत्तर देऊ”, असे आश्वासनही यावेळी फडणवीस यांनी दिले.

- Advertisement -

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे चालविल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, जोपर्यंत या देशात हिंदू मजबूत होता तोपर्यंत या देशावर आक्रमण करण्याची कोणाची हिंमत नव्हती. मात्र जेव्हा या देशातील हिंदू जातीपातीत, वर्णात विभागला गेला आणि दुर्बल झाला तेव्हा मोगल आणि ब्रिटीशांचे आक्रमण झाले. सावरकरांना हा इतिहास माहिती होता. म्हणून त्यांनी हिंदुत्वातील सर्व जातीपाती, वर्णभेद दूर करून सकल हिंदू समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. कर्मकांड न मानता त्यांनी हिंदुत्वाला विज्ञानवादी विचार दिला”, असे फडणवीस यांनी सांगितले.

“बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा हाच वैचारिक वारसा पुढे चालविला. राजकारणात जात हे शस्त्र म्हणून वापरले जाते. मात्र बाळासाहेबांनी हे शस्त्र कधीच वापरले नाही. ज्या व्यक्तीच्या समाजाची ५०० मते देखील मतदारसंघात नाहीत अशा २५ वर्षाच्या तरूणाला तिकिट देऊन त्यांनी लोकप्रतिनिधी बनविले. बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार जेव्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काढण्यात आला तेव्हा देखील व्यापक हिंदुत्वाची भूमिका त्यांनी न्यायालयात मांडली”, असेही फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – कौशल्य विकासातून उत्पादन व सेवा क्षेत्रात नव्या संधी निर्माण करु – देवेंद्र फडणवीस

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -