घरमहाराष्ट्रकोल्हापूर, सांगली, साताऱ्यामधील पुरातील मृतांचा आकडा ४३ वर

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामधील पुरातील मृतांचा आकडा ४३ वर

Subscribe

राज्यातील पुरामध्ये आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुणे विभागांमधून ही माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील पुरामध्ये आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुणे विभागांमधून ही माहिती देण्यात आली आहे. तर ३ जण अजूनही बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये २१ बळी सांगली जिल्ह्यातील असून सात जणांचा कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. याचबरोबर सातारा आणि पुणे जिल्ह्यातही प्रत्येकी सात जणांचा समावेश आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिली होती.

- Advertisement -

पुणे विभागामध्ये पडलेला पाऊस रेकॉर्डब्रेक आहे. यामध्ये अनेक प्रकारची हानी झाली आहे रविवारी दोन मृतदेह सांगली जिल्ह्यामध्ये सापडले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही तर तीन जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्या व्यक्तींमध्ये एक व्यक्ती सांगली तर एक व्यक्ती कोल्हापूर आणि एक व्यक्ती सातारचे आहेत, अशी माहिती म्हैसकर यांनी दिली.

- Advertisement -

कोल्हापूरमधीलल जमावबंदीचा आदेश मागे

कोल्हापूर जिल्ह्यात १२ ते २४ ऑगस्टला रात्री १२ वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा बंदीचे आदेश जारी केला होता. मात्र, या आदेशाबाबत चहूबाजूंनी टीका झाल्यामुळे अखेर हा जमावबंदीचा आदेश मागे घेण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या महापुराची परिस्थितीमुळे विस्कळीत झालेले मन यातून पूरगस्त व नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात १२ ते २४ ऑगस्टला रात्री १२ वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा बंदीचे आदेश जारी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -