घरदेश-विदेशविमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नितीन गडकरींची घरवापसी

विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नितीन गडकरींची घरवापसी

Subscribe

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी प्रवास करत असणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचा दिल्ली दौरा रद्द झाला आला आहे.

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी दिल्लीच्या दिशेला मार्गस्थ झाले होते. मात्र, ऐनवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचा हा दौरा रद्द झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी दिल्लीत दिवंगत माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. नितीन गडकरी देखील याच सभेत जाणार होते. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उड्डाण रद्द करण्यात आले. त्यामुळे नितीन गडकरी यांचा देखील दौरा रद्द झाला आहे.

- Advertisement -

इंडिगो कंपनीचे होते विमान

इंडिगो कंपनीच्या विमानातून नितीन गडकरी दिल्लीला जाणार होते. मात्र, या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याने विमान रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नितीन गडकरी आणि इतर प्रवाशांचा प्रवास रद्द झाला आहे.


हेही वाचा – ‘राहुल गांधी, आधी जम्मू-काश्मीरची परिस्थिती पाहा मग बोला’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -