घरमहाराष्ट्रनिवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला झटका; नगरसेवक एम.के.मढवी तडीपार

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला झटका; नगरसेवक एम.के.मढवी तडीपार

Subscribe

मुख्यमंत्र्यांवर आरोप भोवल्याची चर्चा

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पुर्वी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे समर्थक गटाचे ऐरोलीतील माजी ज्येष्ठ नगरसेवक मनोहर मढवी (एम.के.मढवी) यांना तडीपार करण्यात आल्याने नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. नवी मुंबई पोलिसांकडून कारवाई करत मढवी यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. एन्काऊंटर करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप मढवी यांनी केल्यानंतर शिवतीर्थावर झालेल्या सभेत उध्दव ठाकरे यांनी भाषणात देखील त्यांचा उल्लेख केला होता. दसरा मेळाव्याच्या अवघ्या ४८ तासानंतर ही कारवाई करण्यात आल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आरोप केल्यानेच ही कारवाई केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

ऐरोली विधानसभा मतदार संघातील एम.के.मढवी त्यांच्या पत्नी विनया मढवी आणि मुलगा करण मढवी यांनी राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार राजन विचारे यांना साथ दिली होती.

- Advertisement -

१ ऑक्टोंबर २०२२ रोजी एम.के.मढवी यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील व्हा, नाही तर तडीपार करुन तुमचा एन्काऊंटर करु, अशी धमकी परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिल्याचा आणि पोलिसांकडून छळवणुक होत असल्याचा गंभीर आरोप केला होता.तर त्यानंतर शिवतीर्थावर झालेल्या सभेत उध्दव ठाकरे यांनी भाषणात देखील एकनाथ शिंदे गटाकडून शिवसैनिकांना कशा प्रकारे त्रास दिला जात आहे हे स्पष्ट करताना मढवी यांचा उल्लेख केला होता.

नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत मढवी यांना रायगड ठाणे जिल्हा आणि मुंबई उपनगरमध्ये पुढील दोन वर्ष येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मढवी यांच्यावर १८ गुन्हयाची नोंद आहे. यामध्ये मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि आर्थिक फसवणूक, संवेदनशील काळात दंगल घडवणे, खुनाचा प्रयत्न करणे, खून करणे, खंडणीसाठी धमकावणे, शांतता भंग, सार्वजनिक ठिकाणी मानवी जिवीतास धोका पोचवणे अशा गंभीर गुन्हयाचा समावेश आहे.त्यामुळेच पोलिसांकडून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.ऐन निवडणुकीच्या काळात मढवी यांना तडीपार करण्यात आल्याने ठाकरे समर्थक गटामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

दिघ्यातील दोघे नेते मोकाट

दिघा विभागातील शिवसेनेतून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले माजी नगरसेवक नवीन गवते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड समर्थक राष्ट्रवादी युवकचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष किशोर (अन्नु) आंग्रे यांना काही दिवसांपुर्वी नवी मुंबई पोलिसांकडून तडीपार करण्याच्या अनुषंगाने नोटीस बजावण्यात आली आहे. आता मढवी यांना तडीपार करण्यात आल्यानंतर गवते आणि आंग्रे देखील पोलिसांच्या रडावर असल्याचे सूत्रांनी सांगितले.


एका घटनेमुळे सर्व भारतीय औषधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे; WHO च्या निर्णयावर स्टॅडिंग नॅशनल कमिटीचे स्पष्टीकरण


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -