घरमहाराष्ट्र...आणि अजित'दादां'नी या फोटोसह दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा!

…आणि अजित’दादां’नी या फोटोसह दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा!

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६० वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रातील मंडळींसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या शुभेच्छा विशेष लक्ष वेधून घेत आहेत. अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच एक फोटो ट्विट करून त्याला शुभेच्छांचा मजकूर दिला आहे. या फोटोमध्ये दोघेही ओपन जिपमध्ये बसले असून यात मात्र स्टेअरिंग अजितदादांच्या हातात आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दै. सामनासाठी दिलेली मुलाखत प्रसिद्ध होत आहे. त्यामध्ये त्यांनी राज्यात सरकारमध्ये असलेल्या महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची तीन चाकी गाडी सुरळीत सुरू असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी या गाडीचे स्टेअरिंग माझ्या हातात आहे, असे सूचक वक्तव्यही केले होते. काल आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला अजितदादांचे हे मिश्किल उत्तर तर नव्हे ना, असे तर्क आता राजकीय वर्तुळात लावले जात आहेत.

काय म्हणाले अजित पवार 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा देताना म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितंच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -