घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र ठीक राहायला पाहिजे, पण त्याला बट्टा लागतोय, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला...

महाराष्ट्र ठीक राहायला पाहिजे, पण त्याला बट्टा लागतोय, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला

Subscribe

यासंदर्भात सगळ्यांनीची विचार करायची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात जी नो गव्हर्नन्सची अवस्था पाहायला मिळतेय, ती आधी कधीच महाराष्ट्राने पाहिली नसल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय.

नाशिकः विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. राजकारण जाईल चुलीत. पण, इथलं गव्हर्नन्स ठीक राहिलं पाहिजे, पण त्याला बट्टा लागतोय, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी विमानतळाजवळ माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. त्यावेळी ते बोलत होते.

राजकारण जाईल चुलीत, पण महाराष्ट्र ठीक राहायला पाहिजे. इथले गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे. महाराष्ट्राचा नावलौकिक ठीक राहिला पाहिजे. त्याला बट्टा लागतोय हाच मोठा प्रॉब्लेम आहे. यासंदर्भात सगळ्यांनीची विचार करायची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात जी नो गव्हर्नन्सची अवस्था पाहायला मिळतेय, ती आधी कधीच महाराष्ट्राने पाहिली नसल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

विशेष म्हणजे कालही विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. युक्रेननं नाटोऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मदत मागायला हवी होती. कारण त्यांच्याकडे टोमणे बॉम्ब भरपूर आहेत. तुमच्या घरगड्यांना ईडीनं बोलावल्यानंतर तुम्ही ईडीलाच घरगडी म्हणत असल्याची टोलेबाजीही त्यांनी केलीय. तुम्ही म्हणजे मुंबई, महाराष्ट्र किंवा मराठी नाही. हा समज काढून टाका. त्यामुळे तुमच्यावर केलेला आरोप हा महाराष्ट्रावर आरोप होत नाही, मी जे विषय मांडले, त्यापैकी एकाही बाबतीत मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही. मूळ मुद्दे सोडून त्यांनी अवांतर भाषण केले. हे भाषण सभागृहातील आहे की शिवाजी पार्कवरील, असा प्रश्न आपल्याला पडला आहे. नवाब मलिक यांचे समर्थन उद्धव ठाकरे  करीत आहेत हे पाहून मला मनातून दुःख झाले. ज्यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींसोबत आणि  दाऊदच्या हस्तकांसोबत व्यवहार केले त्यांचे समर्थन उद्धव ठाकरे हे करीत आहेत हे पटणारे नाही. आम्ही मेहबुबा मुफ्ती सोबत सत्तेत गेलो. मात्र जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होऊ शकतात हे दाखवून दिल्यानंतर सत्तेला लाथ मारून बाहेर पडलो. आज याकूबला  फाशी देऊ नका म्हणणारे तुमचे मंत्री आहेत. आज तुम्ही यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात हे विसरू नका, अशी टीका फडणवीस यांनी केली होती.


हेही वाचाः पुणे-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -