घरताज्या घडामोडीभंडारा रुग्णालयात अद्यापही फायर सेफ्टी नाही, राज्य सरकारचे दुर्लक्ष असल्याची फडणवीसांची टीका

भंडारा रुग्णालयात अद्यापही फायर सेफ्टी नाही, राज्य सरकारचे दुर्लक्ष असल्याची फडणवीसांची टीका

Subscribe

पदोन्नती आरक्षणावर राज्य सरकारची भूमिका दुटप्पी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भंडारा- गोंदीया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये फडणवीस कोरोना आणि धान्य खरेदी बाबत आढावा घेत आहेत. भंडाऱ्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फडणवीसांनी भंडारा रुग्णालयाला भेट दिली आहे. या रुग्णालयात मागील वर्षी आगदुर्घटनेमुळे १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर एक वर्षाचा कालावधी सरला तरी राज्य सरकारने अद्याप फायर सेफ्टी केली नाही. त्यामुळे हा अक्षम्य दुर्लक्षपणा असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. तसेच भंडाऱ्यातील म्युकरमायकोसिस रुग्णांच्या उपचाराचाही आढावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

कोरोना प्रादुर्भाव आणि धान्य खरेदी या दोन विषयांचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा जिल्ह्याचा दौरा केला आहे. कोरोनाचा आढावा घेण्यासाठी भंडारा सिव्हिल रुग्णालयाला भेट दिली. सिव्हिल सर्जन यानी भंडाऱ्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली आहे. मध्यंतरी भंडारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती गंभीर होती परंतु आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. परंतु तिसऱ्या लाटेची तयारी करणे अत्यंत महत्त्वाची आहे.

- Advertisement -

म्युकरमायकोसिसवर जास्त भर देणे गरजेचे आहेत. सिव्हिल सर्जन यांनी सांगितले की आता म्युकरमायकोसिसचे काही सक्रिय रुग्ण भंडाऱ्या जिल्ह्यात आहेत. परंतु त्या रुग्णांना सर्जरी करण्यासाठी नागपुरला पाठवावेव लागते कारण इथे तशी यंत्रणा उपलब्ध नाही आहे. सर्जरी झाल्यानंतर त्या रुग्णांना भंडाऱ्यातील रुग्णालयात आणले जात आहे. यावेळी त्यांना सूचना केल्या आहेत की, अर्ली डायग्नोसिस कसे होई शकेल आणि यामध्यमातून कशा प्रकारे स्क्रिनींग करुन या रुग्णांना रोगाची लागण होण्यापासून वाचवता येईल त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. या रोगामध्ये रुग्ण जर पहिले लक्षात आले तर त्यांची प्रकृती चिंताजनक होणार नाही.

रुग्णालयाला भेट दिल्यानंतर एक बाब लक्षात आली आहे की, मागच्या काळात भंडाऱ्यातील याच रुग्णालयात आग दुर्घटना झाली होती. ज्या आगीमध्ये १० बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला १ वर्षाचा कालावधी झाला. आज त्याबाबत माहिती घेतली असता समजते आहे राज्य सरकारने अद्यापही या रुग्णालयात अग्नी सुरक्षा केली नाही. राज्य सरकारचा हा अक्षम्य दुर्लक्षपणा आहे. या गोष्टीकडे लक्ष देण्याची अवश्यकता आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी पिडियाट्रिक अशा व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. याबाबत आमदार, खासदार लक्ष घालत आहेत. कोरोनासोबतच धान खरेदी विषय महत्त्वाचा आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे. धान खरेदी होत नाही आहे. बोनस मिळालेलं नाही आहे. केंद्र बंद आहे. शेतकरी फार मोठ्या संकटामुळे अडचणीत यावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

राज्य सरकारची भूमिका दुटप्पी

पदोन्नती आरक्षणावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले आहे की, या संदर्भात राज्य सरकारची भूमिका दुटप्पी आहे. यांचा समाजिक न्याय हा बोलण्याकरता वेगळा आहे आणि हे ठरवुन वागतात असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -