घरमहाराष्ट्रपडळकरांच्या 'त्या' विधानावर फडणवीसांचं थेट उत्तर; म्हणाले...

पडळकरांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांचं थेट उत्तर; म्हणाले…

Subscribe

गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत देवेंद्र फडणवीसांना प्रसारमाध्यमांनी प्रश्व विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे.

भाजप आमदार गोपचंद पडळकर आणि अजित पवार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. पडळकरांनी अनेकदा शरद पवारांसह पवार घराण्यावर टीका केली आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांवर बोलताना वादग्रस्त विधान केलं. त्यावर अजित पवार गट आक्रमक झाला होता, असं असतानाही पुन्हा एकदा पडळकर यांनी आपण अजित पवार यांना सिरियसली घेत नसल्याचं म्हटलं. आता यावर मात्र वरिष्ठ भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पडळकर यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis direct reply to Gopichand Padalkar s statement)

काय म्हणाले होते पडळकर?

धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.

- Advertisement -

सुप्रिया सुळेंवरही साधला होता निशाणा

गोपीचंद पडळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीकास्त्र डागलं होतं. धनगर समाजाने तुमच्या पालख्या वागवल्या. लोकांच्या चपला फाटल्या, तरी तुमच्या वडिलांनी, भावाने , पुतण्याने किंवा तुम्ही धनगर समाजाकडे पाहिलं नाही. त्यामुळे धनगर समाजाबद्दल जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आमचे लोक हुशार झाले आहेत, अशा शब्दांत पडळकरांनी सुळेंना सुनावलं होतं.

अशी विधानं चुकीची- देवेंद्र फडणवीस

गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत देवेंद्र फडणवीसांना प्रसारमाध्यमांनी प्रश्व विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशाप्रकारची विधानं करणं चुकीचं आहे. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. याप्रकराच्या भाषेचा वापर करू नये, असं माझं स्पष्ट मत आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: बळीराजाचा आवाज सरकारला ऐकू येत नाही का? कांद्याच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा प्रश्न )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -