घरताज्या घडामोडी'सिंह कधी गिधाडाला घाबरत नाही', देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर पलटवार

‘सिंह कधी गिधाडाला घाबरत नाही’, देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर पलटवार

Subscribe

संजय राऊत संपादक आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे की, हेडलाईन कशी करता येईल. म्हणून तशा प्रकारचे वक्तव्य करुन दिवसभर चर्चेत राहण्याचे काम संजय राऊत करतात असे फडणवीस म्हणाले.

सिंह कधी गिधडांना घाबरत नाही असा पलटवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर नागपूरला जाता येणार नाही असे वक्तव्य संजय राऊत यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊत सव्हिक्टिम कार्ड खेळत आहेत. केवळ चर्चेत राहण्यासाठी ते विक्टिम कार्ड खेळत असल्याचे राऊत म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी काँग्रेस पार्टी कमजोर झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचे कौतुक केले त्यावरही प्रतिक्रिया दिली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी फडणवीसांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न करण्यात आला होता. यावेळी फडणवीस म्हणाले की, ईडी काय करते ते ईडी सांगेल, मला असं वाटतं की, संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सगळे वक्तव्य त्याचाच भाग आहे. राऊतांनी त्यांचे मत न्यायालयात मांडावं, रोज सकाळी ९ वाजता येऊन संजय राऊत मनोरंजन करण्याचे काम करत असतात. त्याच्यापेक्षा त्यांच्या वक्व्याला महत्त्व देऊ शकत नाही. त्यांना एवढेच सांगू इच्छितो की, सिंह कधी गिधडांच्या धमक्यांना घाबरत नाही. त्यांनी कोर्टात जावं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये त्रास देण्याचे काम करत नाही. यामुळे त्यांनी व्हिक्टिम कार्ड खेळण सोडावे, असा पलटवार फडणवीसांनी राऊतांवर केला आहे.

- Advertisement -

संजय राऊत संपादक आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे की, हेडलाईन कशी करता येईल. म्हणून तशा प्रकारचे वक्तव्य करुन दिवसभर चर्चेत राहण्याचे काम संजय राऊत करतात असे फडणवीस म्हणाले.

कोणतेही नवीन समीकरण नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केलं आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. याबाबत फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठलही नवीन समीकरण नाही. भाजप पक्ष महाराष्ट्रात विरोध पक्षाच्या भूमिकेत प्रखरतेने काम करेल आणि पूर्ण शक्तीने आम्ही आमच्या बहुमतावर महाराष्ट्रात सरकार स्थापन करु असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्रातील काँग्रेस कमजोर

काँग्रेसचा आपल्या लोकांवर विश्वास नाही आहे. भाजपमध्ये कोणाला शपथ देण्याची आवश्यकता नाही. पण काँग्रेस पार्टी कमजोर झाली आहे. राज्यापासून ते दिल्लीपर्यंत कोणी कोणाचे ऐकायला तयार नाही. त्यामुळे ही कमजोर पार्टी आहे. जिथे पार्टीचे नेतृत्व धीट असते तिथे अशा प्रकारच्या गोष्टी कऱण्याची आवश्यकता नसते असा टोला फडणवीसांनी काँग्रेसला लगावला आहे.


हेही वाचा : आम्ही तुमच्या घरात घुसलो तर नागपूरला जाता येणार नाही, राऊतांचा ईडी कारवाईवरुन फडणवीसांना इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -