घरताज्या घडामोडीयोजना अनेक तयार होतात मात्र शेवटच्या माणसापर्यंत पोहचत नाहीत, फडणवीस यांनी व्यक्त...

योजना अनेक तयार होतात मात्र शेवटच्या माणसापर्यंत पोहचत नाहीत, फडणवीस यांनी व्यक्त केली खंत

Subscribe

आपल्या देशात अनेक योजना तयार होतात मात्र त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचत नाही अशी खंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरमधील प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी तरुणांना स्वयंरोजगाराकडे वळावे असे आवाहन केलं आहे. नोकरी सगळेच मागायला येतात मात्र कोणी स्वयंरोजगाराकडे वळत नाही यामुळे तरुणांनी स्वयंरोजगाराकडे वळावे असे देवेंद्र फडणीस यांनी म्हटलं आहे. तसेच नागपूरमध्ये ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व्हावं यासठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत आयोजित कार्यशाळेत आपलं मनोगत व्यक्त केलय यावेळी देवेंद्र फडणीस यांनी म्हटलं आहे की, खादी ग्रामोद्योगमद्ये नियुक्ती झाल्यानंतर सातत्याने त्याची लोकाभीमुक्ता वाढवण्याचा प्रयत्न जयप्रकाश गुप्ता करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शहरातल्या आणि गावातल्या समान्य माणसाला ट्रेनिंग मिळाले पाहिजे, रोजगार मिळाले पाहिजे तसेच रोजगारासाठी वित्त मिळाले पाहिजे. या दृष्टीने केव्हिआयसीच्या माध्यमातून सुरु झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जबाबदारी असताना त्यांनी लोकांपर्यंत योजना पोहचवण्याचे काम केलं असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींपर्यंत केव्हिआयसीची योजना पोहचवण्याचे काम केलं आहे. आपल्या देशात योजना अनेक तयार होतात पण त्या योजना उचित लोकांपर्यंत पोहचत नाहीत. लोकप्रतिनिधींना जर त्या योजना समजल्या तर त्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचतात. केव्हिआयसीचा योग्य वापर केला तर आपण रोजगाराची समस्या सोडवू शकतो. महिला उद्योजकांनी स्टॉल्स लावले आहेत. या स्टॉल्सवर विविध प्रकारचे प्रोडक्ट ठेवण्यात आले आहेत. या उद्योगांना बळ देण्याचं महत्त्वाचं काम आहे. कोरोना नंतर या उद्योगांना मदत केली तर ते चांगले होऊ शकतात असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूरला करणार

नागपुरात खादी आणि ग्रामोद्योगाचे प्रक्रिया केंद्र व्हावे यासाठी आपण स्वतः केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या खात्याची जबाबदारी होती त्यावेळी त्यांनी उत्तम काम केले आहे. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. नारायण राणे यांनी म्हटलं आहे की विदर्भात विकास कामे लवकरात लवकर पुर्ण करु अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : घटनादुरुस्तीचा अपप्रचार कराल तर आम्ही पोलखोल सभा घेऊ, चंद्रकांत पाटील यांचा इशारा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -