घरताज्या घडामोडीST कामगार संपावर गेले अन् मंत्री नाचगाण्यात मग्न, फडणवीसांची मुंडेंवर टीका

ST कामगार संपावर गेले अन् मंत्री नाचगाण्यात मग्न, फडणवीसांची मुंडेंवर टीका

Subscribe

राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. एसटी कर्मचारी संपावर गेलेत आणि मंत्री मात्र नाचगाण्यात मग्न आहेत अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता केली आहे. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात दिवाळी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिचा नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमावरुन विरोधकांनी धनंज मुंडे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. फडणवीस म्हणाले की, मला स्वतःला आश्चर्य वाटतं एकीककडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालल्या आहेत दुसरीकडे एसटी कर्मचारी संपावर आहेत आणि मंत्री नाचगाण करत आहेत असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

- Advertisement -

आम्हाला मातीत गाडणारे स्वतः गाडले गेले

भाजपला आम्ही मातीत गाडून टाकू असे एका मंत्र्याने म्हटलं आहे. अरे वेड्या महाराष्ट्राच्या मुंबईच्या मातीतून उभी राहिली आहे. दोन वरुन ३०२ वर गेलेली ही पार्टी आहे. ४ ते ६ खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला सांगण्याचे कारण नाही आहे. आम्हाला मातीत गाडून टाकणारे स्वतः गाडले गेले परंतु आम्हाला गाडू शकले नाही. हे आम्हाला सांगत आहेत की भाजपला गाडून टाकू पण त्यांना एवढेच सांगतो की, भाजपचा एक कार्यकर्ता हा देखील तुमचा मुकाबला करण्यासाठी पुरेसा आहे. कृपया अशा वल्गना करु नका सामान्य माणसाच्या हिताचे काम करा असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना नाव न घेता दिला आहे.

मविआसारखे वसुली सरकार कुठेही पाहिले नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वसुली सरकारवरही निशाणा साधला आहे. आज परिस्थिती अशी आहे की २ वर्ष झाले सरकार आलं परंतु कोणतेही काम होत नाही. सगळी काम बंद आहेत. राज्यातील शेतकरी अडचणीत आले कोणीही पाहायला तयार नाही. कोरोना काळात अडचणीत आले कोणीही पाहायला तयार नाहीत. वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती आल्या कोणीही पाहायला तयार नाही. जे बोलत नाही, हालत नाही, डुलत नाही असं सरकार राज्यात आहे. हे सरकार फक्त एकच काम करते ते म्हणजे वसुली, दुकानदार, कंत्राटदार, शेतकरी, सामान्य माणूस, दुकानदार या सगळ्यांकडून वसुली सुरु आहे. यासारखे वसुली सरकार कुठेही पाहिले नव्हते. सरकारमधील गृहमंत्रीच जेलमध्ये असल्याचे सरकार कुठेही पाहिलं नाही असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ST worker suicide : चंद्रपूरात एसटी कर्मचाऱ्याची विष पिऊन आत्महत्या

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -