घरताज्या घडामोडीदिल्ली वारी केल्यावर राज्यात पतंगबाजी होते, अमित शाह यांच्या भेटीवर फडणवीस यांची...

दिल्ली वारी केल्यावर राज्यात पतंगबाजी होते, अमित शाह यांच्या भेटीवर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Subscribe

कोणतंही आयुध वापरायचं नाही हा ठराव होत असेल तर विधिमंडळच कामकाज फासावर लटकवण्यासारखच

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याच्या अफवांर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी म्हटलं आहे की, दिल्लीत गेल्यावर राज्यात पतंगबाजी होते त्यामुळे माझेही मनोरंजन होत असतं अशी मिश्किल प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागपूरच्या शिष्टमंडळासह मी दिल्लीत गेलो असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई केली असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यातील दोन दिवसीय विधीमंडळाचे अधिवेशन हे लोकशाहीला पायदळी तुडवण्याचा प्रकार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मी दिल्लीला नागपूरचे शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो. या शिष्टमंडळासह धर्मेंद्र प्रदान यांना भेटण्यासाठी गेलो होतो. धर्मेंद्र प्रदान यांची भेटीला वेळ होता यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटलो त्यांच्यासोबत १५ मिनिट भेट झाल्यानंतर मग धर्मेंद्र प्रदान यांची भेट घेतली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. परंतु मी दिल्लीत गेल्यावर राज्यात पतंगबाजी होते या पतंगबाजीमुळे माझेही मनोरंजन झाले असल्याचं मिश्किल वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांचे पत्र

नेहमीच कुठलाही पक्ष घटना घडली की चौकशी करावी अशी मागणी करत असते. भाजपने कुठेही ठराव केला नाही की, यांना अपराधी मानले पाहिजे, जेलमध्ये टाकले पाहिजे असा ठराव केला नाही. चंद्रकांत पाटील यानी पत्र लिहिले आहे की, असं जर कुठे घडले असेल तर त्याची चौकशी केली पाहिजे यामध्ये काही गैर नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई

जरंडेश्वर साखर कारखानाबाबत सरळ एफआयआर करायला मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले आणि तो एफआयआर नोंदवण्यात आला त्यानंतर ईडीने त्याचा ईसीआर नोंदवला त्यातून चौकशी सुरु केली आहे. ही चौकशी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरु आहे. त्यामुळे ईडीची चौकशी राजकीय नसून ती उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरु असलेली चौकशी आहे.

- Advertisement -

लोकशाहीला पायदळी तुडवण्याचा प्रकार

राज्य सरकारनं दोन दिवसाचे अधिवेशन ठेवण्यात आलं आहे. अधिवेशनात लक्ष्यवेधी असणार नाहीत. तारांकित प्रश्न असणार नाहीत. तसेच कोणतही आयुध वापरता येणार नाही. फडणवीस यांनी म्हटलं आहे की, कोणतंही आयुध वापरायचं नाही हा ठराव होत असेल तर विधिमंडळच कामकाज फासावर लटकवण्यासारखच आहे. लोकशाहीला पायदळी तुडवण्याचा हा प्रकार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -