घरमहाराष्ट्रमुंडे बहिण-भाऊ एकाच व्यासपीठावर, धनंजय मुंडे-प्रीतम मुंडेंमध्ये शाब्दिक जुगलबंदी

मुंडे बहिण-भाऊ एकाच व्यासपीठावर, धनंजय मुंडे-प्रीतम मुंडेंमध्ये शाब्दिक जुगलबंदी

Subscribe

परळीमध्ये मुंडे बंधू-भगिनी सोमवारी एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय (Dhananjay Munde) आणि बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्या शाब्दिक जुगलबंदी रंगली. परळी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रमात मुंडे बहिण-भाऊ एकाच मंचावर आले होते. (Dhananjay Munde-Pritam Munde on the same stage)

प्रीतम मुंडे यांनी भाषण करताना धनंजय मुंडे यांना टोला लगावला. परळीत सुरू असलेल्या विकास कामाच्या नावाखाली रस्त्यांची सुरु असलेल्या कामांमुळे अनेक खड्डे पडले आहेत. यामुळेच मला आज या कार्यक्रमात येण्यास वेळ लागला, असा टोला प्रीतम मुंडे यांनी नाव न घेता धनजय मुंडे यांना लगावला. पुढे बोलताना त्यांनी मी एवढं दिलं, तेवढं दिलं, समाजासाठी अमुक केलं तमुक केलं अशा प्रकारचा हा कार्यक्रम नाही. हा कार्यक्रम हा धार्मिक आहे आणि परळीच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा आहे, असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.

- Advertisement -

दरम्यान, प्रीतम मुंडे यांच्यानंतर धनंजय मुंडे यांनी भाषण करायला सुरुवात केली. मी पाहिलेलं स्वप्न आणि तुम्ही पाहिलेलं परळीच्या विकासाचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. मात्र यासाठी मुळात पाया पक्का करावा लागतो आणि हा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागतो आहे. परळीत सुरू असलेले रस्त्याचे काम आधी पक्के करत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. मला आपल्या परळीच्या विकास कामाचा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागत आहे. म्हणून प्रीतम मुंडे यांना या ठिकाणी येण्यास वेळ लागला असावा, असं मला वाटतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -