घरमहाराष्ट्रडोंबिवलीत पाण्यावरून शिवसेनेच्या नगरसेविका भिडल्या 

डोंबिवलीत पाण्यावरून शिवसेनेच्या नगरसेविका भिडल्या 

Subscribe

मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

डोंबिवली शहरात पाणी जोडणीच्या प्रकारावरून शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला आहे. सेनेच्या नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांनी नगरसेविका आशालता बाबर यांच्या कानशिलात लगावली. दरम्यान याप्रकरणी बुधवारी बाबर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसते आहे.

शिवसेना आमदारांच्या कार्यालयाबाहेर झाला वाद

नगरसेविका बाबर यांच्या प्रभागातील नांदिवली परिसरातील रविकिरण सोसायटीकरिता पाणी कनेक्शन देण्यावरून म्हात्रे आणि बाबर यांच्यात वाद झाला. हा प्रकार सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला. सोसायटीला पाणी कनेक्शन दिल्यास त्याचा विपरीत परिणाम प्रभागात होणार असल्याने म्हात्रे यांनी हरकत घेतली होती. त्यावरून हा वाद होऊन हाणामारीचा प्रकार घडला. विशेष म्हणजे शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयासमोर हा वाद झाला होता. यावेळी नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांनी आमच्यामध्ये वाद झाला मात्र बाबर यांना मारहाण केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -