घरमहाराष्ट्रRahul Narwekar : सरकार पडणार अशी भाषा करू नये, राहुल नार्वेकरांचा विरोधकांना...

Rahul Narwekar : सरकार पडणार अशी भाषा करू नये, राहुल नार्वेकरांचा विरोधकांना टोला

Subscribe

सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे. सरकार पडायचे असते तर सभागृहातील संख्याबळावर पडले असते, त्यामुळे उगाचच कोणीतरी सरकार पडणार अशी भाषा करू नये, असे नार्वेकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात आता विधिमंडळात बुधवारपासून मॅरेथॉन सुनावणी पार पडणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता नार्वेकरांना त्या तारखेपर्यंत सुनावणी करणे हे बंधनकारक आहे. परंतु, या सुनावणीच्या मुद्द्यावरून राहुल नार्वेकर यांच्याकडून मोठे वक्तव्य करण्यात आले असून त्यांनी विरोधकांना टोला देखील लगावण्यात आला आहे. सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे. सरकार पडायचे असते तर सभागृहातील संख्याबळावर पडले असते, त्यामुळे उगाचच कोणीतरी सरकार पडणार अशी भाषा करू नये, असे नार्वेकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Do not use language that will bring down government, Rahul Narwekar warns opposition)

हेही वाचा – Marathi Boards : दोन दिवसांत मराठी भाषेत पाट्या लावा अन्यथा…, ठाकरे गट आक्रमक

- Advertisement -

याबाबत बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, सरकार पडायचे असेल तर ते सभागृहातील संख्याबळावर पडत असते. सभागृहात अविश्वास ठराव झाल्यानंतर संख्याबळ कमी असेल तर ते सरकार पडते. बाहेर कोण बोलतोय म्हणून सरकार पडत नसते. या सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे आणि तेवढी संख्या असल्याने त्यांनी बहुमताची अग्निपरीक्षा पास केली आहे. उगाचच कोणीतरी असंवैधानिकपणे सरकार पडणार पडणार अशी भाषा वापरू नये, असे त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

तर, आमदार अपात्रत्रेबाबत वेळेतच निर्णय होणार आहे. सुप्रीम कोर्टाने जो टाईम बाँड दिला आहे. त्यानुसार वेळेत निर्णय द्यायचा माझा विचार आहे. पण कोणत्याही नैसर्गिक न्याय तत्त्वाला धक्का पोहचणार नाही. विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही. आमदार अपात्रतेबाबत योग्य वेळेत निर्णय घेणार आहे, असेही नार्वेकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे युवानेते राहुल नार्वेकर यांच्यावर देखील टीका केली आहे. पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाले आहे की नाही याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घ्यायचा नाही. निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे. त्यामुळे उगाच पक्षांतर बंदी कायद्याचा उल्लंघन झाले आहे, अशा प्रकारचे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी करू नये. जर या कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर निश्चितच सक्षम विधानसभा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेईन. महाराष्ट्रातील जनतेला मी आश्वासीत करतो की कुठल्या प्रकारचा चुकीचा निर्णय दिला जाणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने निश्चिंत राहावे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांना लगावण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -