घरमहाराष्ट्रAwhad : सत्तेशिवाय दोन दिवस राहिले तर कासावीस होणारे गद्दार... आव्हाडांनी केसरकरांना...

Awhad : सत्तेशिवाय दोन दिवस राहिले तर कासावीस होणारे गद्दार… आव्हाडांनी केसरकरांना सुनावले

Subscribe

मुंबई : शिक्षक भरती प्रक्रियेवरून बीडमध्ये रविवारी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि एक महिला उमेदवारादरम्यान शाब्दिक चकमक उडाली. हा बेशिस्तपणा खपवून घेणार नाही, असे संतप्तपणे सांगतानाच दीपक केसरकर यांनी, तुमचे नाव घेऊन डिस्क्वॉलिफाय करायला लावेन, असा इशाराही त्या महिलेला दिला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केसरकर यांना सुनावले आहे.

हेही वाचा – Supriya Sule : मंत्र्यांना नेमकी भीती कशाची? सुप्रिया सुळेंचा भुजबळांसह केसरकरांवर निशाणा

- Advertisement -

राज्यात शिक्षकांच्या 30 हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा गेल्या महिन्यात मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. या शिक्षक भरतीच्या जाहिरातीकडे लाखो उमेदवारांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमासाठी मंत्री दीपक केसरकर रविवारी बीडमध्ये आले असता एका महिलेने शिक्षक भरतीवरून प्रश्न उपस्थित केला. त्यांच्याशी बोलताना शब्दाला शब्द वाढत गेला आणि दीपक केसरकर त्या महिलेवर संतप्त झाले.

- Advertisement -

आपण शिक्षक भरतीची पाच वर्षे वाट पाहात होतो. आता वेबसाइट सुरू झाली असून आपली नोंदणी प्रक्रिया देखील झाली आहे. पण प्रोसिजर पुढे चालतच नसल्याची तक्रार त्या महिला उमेदवाराने शिक्षणमंत्री केसरकर यांच्याकडे केली. त्यावर केसरकर यांनी तिला ‘श्रद्धा आणि सबुरी’चा सल्लाही दिला. पण भरती प्रक्रियेबद्दलचा उलगडा न झाल्याने ती महिला पुन्हा-पुन्हा प्रश्न विचारत राहिली. त्यामुळे संतप्त झालेल्या केसरकर यांनी, अजिबातमध्ये बोलायचे नाही, नाहीतर तुमचे नाव घेऊन तुम्हाला डिस्क्वॉलिफाय करायला लावेन, असा धमकीवजा इशारा तिला दिला.

हेही वाचा – Recruitment : …तर क्वॉलिफायही करू शकत असाल, रोहित पवारांचा केसरकरांना बोचरा सवाल

यावरून विरोधकांनी केसरकर यांना फैलावर घेतले आहे. राज्याचे माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत केसरकर यांच्यावर टीका केली आहे. सत्तेशिवाय दोन दिवस राहिले तर कासावीस होणारे गद्दार पाच वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मुलींना ‘श्रध्दा आणि सबुरी’ शिकवत आहेत. प्रत्येकाला नोकरी ही अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची असते. तुम्हाला उत्तरे द्यावीच लागतील. जनतेला उत्तर देणे हे तुमचे काम आहे. ही अरेरावीची भाषा तुमच्या घरात चालत असेल. पण महाराष्ट्राची जनता अशी दादागिरी खपवून घेणार नाही, असे त्यांनी सुनावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -