घरCORONA UPDATEदहावी, बारावी निकालाच्या तारखांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका; विद्यार्थ्यांना आवाहन

दहावी, बारावी निकालाच्या तारखांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका; विद्यार्थ्यांना आवाहन

Subscribe

बोर्डाकडून विविध प्रयत्न करण्यात येत असताना सोशल मीडियावर निकालाच्या विविध तारखा पसरवल्या जात आहेत. मात्र, या तारखांवर व अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलग चारवेळा वाढवलेल्या लॉकडाऊनमुळे दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी रखडली आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी करता यावी, यासाठी बोर्डाकडून विविध प्रयत्न करण्यात येत असताना सोशल मीडियावर निकालाच्या विविध तारखा पसरवल्या जात आहेत. मात्र, या तारखांवर व अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी केले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन पुढील काळात तो रद्द केला. तसेच शाळा कॉलेजना सुट्टी जाहीर केली. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प झाले. त्यावर शासनाने शिक्षकांना घरी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी परवानगी दिली. मात्र, उत्तरपत्रिका शाळा-कॉलेजांमध्ये अडकून पडल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे कामही रखडले. काही दिवसांपासून शिक्षक शाळा, कॉलेजांमधून उत्तरपत्रिका तपासून राज्य मंडळाकडे जमा करत आहेत. परंतु, सर्वाधिक कोरोना प्रभावित भागातील शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे इयत्ता दहावी बारावीची परीक्षा घेण्यात आली. या सर्व विभागीय मंडळांची निकाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय राज्य मंडळाला निकाल जाहीर करता येत नाही. सोशल मीडियावर निकालाच्या तारखा प्रसिद्ध होत असल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. दहावी-बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा व तारखांवर विद्यार्थी व पालकांनी विश्वास ठेवू नये. राज्य मंडळाकडून यथावकाश निकालाच्या तारखांबाबतची माहिती प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती काळे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -