घरमहाराष्ट्रमराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊ नका, 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही...

मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊ नका, 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही – नारायण राणे

Subscribe

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या 17 व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिष्टमंडळाने त्यांची आज (14 सप्टेंबर) भेट घेतली. यावेळी जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली. त्यांच्या या चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून फळांचे ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. याशिवाय जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यासाठी महिनाभराचा वेळ दिला आहे. मात्र मराठा समाजाला सरसकट कुणबी  दाखले देऊ नका अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. (Dont give Kunbi certificates to the Maratha community there is no demand for 96 clan Marathas Narayan Rane)

नारायण राणे म्हणाले की, 17 दिवसांच्या उपोषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्युस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे. 17 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बसलेल्या मनोज जरांगे यांनी अखेर उपोषण सोडलेलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्यसरकारला महिनाभराचा कालावधी दिलेला आहे. तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णयही राज्यसरकारने याआधीच जाहीर केलेला आहे, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – लागेल तेवढा वेळ घ्या पण आरक्षण द्याच; उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगेची भूमिका

नारायण राणे म्हणाले की, मला सरकारला सांगावसं वाटतं की, मराठा आरक्षणाची मागणी अनेक वर्षे जुनी आहे. यापूर्वी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि सुरुही झाला होता. पण त्यानंतर न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही. पण आता मागणी अशी आहे की, मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावे. मला विरोध नाही करायचं, पण एवढंच म्हणायचं आहे की, सरसकट असू करू नका, अशी मागणी नारायण राणे यांनी केली.

- Advertisement -

सरसकट कुणबी दाखला ही 96 कुणबी समाजाची मागणी नाही

मराठा समाजाला आरक्षण देताना राज्य सरकारने घटनेतील कलम 15 (4) आणि 16 (4) याचा अभ्यास करावा आणि सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेले मराठा समाजाचे जे लोक आहेत त्यांना आरक्षण द्यावं. कारण सरसकट कुणबी दाखला ही 96 कुणबी समाजाची मागणी नाही. त्यामुळे सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार करण्यापेक्षा घटनेतील समाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेल्यांचा सर्व्हे व्हावा. महाराष्ट्रात जवळपास 38 टक्के मराठा समाज आहे. जे गरीब आहेत, ज्यांना पैश्याअभावी शैक्षणिक पात्रता मिळवता आली नाही, अशा लोकांना कुणबी दाखले देण्यात यावे, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.

हेही वाचा – जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ सरणावर बसलेल्या बोरगुडेंचा उपोषणाचा चौथा दिवस

मराठा समाजाला आरक्षण देताना द्वेष भावना असू नये

कुठल्याही दुसऱ्या जातीचं आरक्षण काढावं आणि इतरांना द्यावं अशा मताचा मी नाही, हे स्पष्ट करताना नारायण राणे म्हणाले की, मी यापूर्वी 16 टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं. त्यावेळी मी म्हटलं होत की, दुसऱ्याचं आरक्षण काढून इतरांना देण्यापेक्षा घटनेनं तरतूद केल्याप्रमाणे 15 (4) प्रमाणे आरक्षण देण्यााचा राज्य सरकारला आहे. त्याप्रमाणे मी त्यावेळी 16 टक्के मंजूर केलं होतं, त्याप्रमाणे देण्यातं यावं असं मला वाटतं. कोणी म्हणतं म्हणून आपण मागणी पूर्ण करत असताना कोणाचाही अपमान होणार नाही, हे पाहावं. कारण मराठा आरक्षण मराठा समाज मागत असताना याआधी जी आरक्षण वेगवेगळी देण्यात आली होती, तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मराठेच मुख्यमंत्री होते. त्यांनी आरक्षण दिलेली आहेत. मराठ्यांनी कधी कोणालाही आरक्षण देताना द्वेष केला नाही. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण देताना द्वेष भावना असू नये, असेही नारायण राणे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -