घरमहाराष्ट्र"पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करू नका", आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना इशारा

“पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करू नका”, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना इशारा

Subscribe

मुंबई : यापुढे वैयक्तिक पातळीवरची टीक नको, राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख ठाकरे गटाकडून केला गेला तर त्याला तोडीस तोडउत्तर भाजपकडून दिले जाईल, अशा इशारा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानावर टीका करताना उल्लेख केला. यानंतर भाजपकडून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल सुरू आहे.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानाचा एकेरी उल्लेखावर आशिष शेलार म्हणाले, “यापुढे पंतप्रधानांचा एकेरी शब्दात उल्लेख करू नका. आज विनंती करतोय, पण यापुढे केला तर भाजपच्या नेत्यांकडून तुम्हाला सडेतोड अपमान झाला. तर वाईट वाटून घेऊ नका. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतात आणि ते झालेच पाहिजे. आम्ही पातळीला पातळीनेच उत्तर देऊ, खालच्या पातळीवर उद्धव ठाकरे बोलाल तर त्याच पातळीवर भाजपचा नेता तुम्हाला उत्तर देईल. मग वाईट वाटले बोलू नका.”

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचे तुकडे-तुकडे करू; उद्धव ठाकरेंचा इशारा

पतप्रधानांच्या कुटुंबावर बोलण्याआधी…

पंतप्रधानांच्या कुटुंबावर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात टीका केली. यावर आशिष शेलार पुढे म्हणाले, “तुम्ही कुटुंबाचा विषय काढाल, तर तुम्हीला प्रतिप्रश्न जास्त येतील. पतप्रधानांच्या कुटुंबावर बोलण्याआधी तुम्हाला याची उत्तर द्यावी लागेल की, तुमच्या कुटुंबात काय चालू आहे. तुमच्या सख्या भावाशी तुमचे सख्खे आहे का? का वेगळे राहता. उद्धवजी याचे उत्तर देऊ शका? स्वत:च्या वडिलांच्या संपत्तीसाठी तुम्ही भावासोबत कोर्टात तुम्ही भांडण केले की नाही केले. आम्हाला कोणाच्या घरात जायाचे नाही. पण कुटुंबाचा विषय तुम्ही काढलात”, अशी बोचरी टीका आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेवर टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा – काँग्रेस, समाजवादीनंतर एमआयएम-ओवैसी यांच्यासोबत युती करतील अन्…; शिंदेंचा ठाकरेंना टोला

तुमची सत्ता ग्रामपंचायतीत तरी राहणार का?

आशिष शेलार पुढे म्हणाले, “सत्ता आणणार म्हणजे माझा त्यांना प्रश्न आहे. तुमची ग्रामपंचायती तरी सत्ता राहणार आहे का? हे सांगा. सत्ता आणण्याचा विषय जाऊ द्या. ज्या आहेत त्या तरी राहणार आहेत का? तुमचे लोकसभेतील खासदार गेले, विधानसभेतील आमदार गेले, महानगरपालिकेतील नगरसेवक चालले. जिल्हापरिषदेचे अध्यक्ष गेले. सरपंच गेले. ग्रामपंचायतीमध्ये तरी तुमची सत्ता राहणार आहे का? या प्रश्नाचे उत्तर द्या, असे अनेक प्रश्न आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -