घरमहाराष्ट्रप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना ईडीचे पुन्हा समन्स

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना ईडीचे पुन्हा समन्स

Subscribe

मनी लाँड्रिंग प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना ईडीने समन्स बजावले आहेत. ईडीने आज १ जुलै रोजी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, भोसले यांच्या मुलाला देखील ईडीने समन्स बजावले आहेत. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अविनाश भोसले यांची याआधी देखील चौकशी करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.

अविनाश भोसले यांना ईडीने पुण्यातील जमीन खरेदीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स बजावले आहेत. अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले याला देखील समन्स बजावले आहेत. अमित भोसलेला उद्या २ जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भोसले यांनी पुण्यात निवासी इमारतीच्या जागी अवैध इमारत बांधल्याचा आरोप ईडीनेकडून ठेवण्यात आला आहे. भोसले यांनी संबंधित जमीन खरेदीसाठी बेकायदा व्यवहार केल्याचा ही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, ईडीने गुन्हा रद्द करावा यासाठी अविनाश भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने दिलासा न देता चौकशीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

भोसलेंची ४०.३४ कोटींची मालमत्ता जप्त

ईडीने याआधी अविनाश भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जाते. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त केली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. या संपूर्ण प्रकरणात आता ईडीने भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

तसंच ईडीने फेमा कायद्यांतर्गत कारवाई करत भोसले यांना १ कोटी ८३ लाखांचा दंड केला होता. २००७ मध्ये अमेरिका आणि दुबई दौरा करुन भारतात येताना परकीय चलन आणि महागड्या वस्तू कस्टम ड्युटी न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. यापूर्वी त्यांची मुंबईत चौकशी सुरू होती. आता पुण्यातल्या कार्यालयात ईडीने चौकशी सुरू केली आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -