घरमहाराष्ट्रदगडफेकीनंतर पडळकर आक्रमक, दगडफेक करणाऱ्या तरुणासोबतचा रोहित पवारांचा फोटो ट्विट

दगडफेकीनंतर पडळकर आक्रमक, दगडफेक करणाऱ्या तरुणासोबतचा रोहित पवारांचा फोटो ट्विट

Subscribe

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी रात्री सोलापुरात दगडफेक झाली. या दगडफेकीनंतर पडळकर आक्रमक झाले आहेत. प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण अशा भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे ना उद्याही दबेल, असा इशारा पडळकरांनी दिला. तसंच, पडळकर यांनी हल्ला करणाऱ्या तरुणाचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे असं सांगताना मुद्द्यांवर बोला म्हणणारी राष्ट्रवादी आता गुद्द्यांवर का आली? असा सवाल केला. माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय. मुद्द्यांची बात करणारी राष्ट्रवादी गुद्द्यांवर आलीय. राष्ट्रवादीचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. बहुजनांवर अन्याय करणारे हे लोक आहेत.

- Advertisement -

हल्लेखोराने शरद पवारांच्या नावाची घोषणा दिली

गोपीचंद पडळकर यांनी दगडफेक करणाऱ्या तरुणाने शरद पवारांच्या नावाची घोषणा दिल्याचं म्हटलं आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता. तसंच हा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने केला असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -