घरमहाराष्ट्रप्लास्टिक बंदीमुळे वारकऱ्यांवर मोठे संकट

प्लास्टिक बंदीमुळे वारकऱ्यांवर मोठे संकट

Subscribe

वारीदरम्यान वारक-यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे स्वत:च्या उपजीविकेच्या वस्तू, पिण्याच्या पाण्यासाठी बाटली, प्लास्टिक कागद, खाण्यासाठी पदार्थ साठवणूक अशा अनेक गोष्टींसाठी प्लास्टिकचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. पर्यायाने प्लास्टिक बंदीमुळे आता वारकऱ्यांवर मोठे संकटच उभे रहाणार आहे.

महाराष्ट्राला शेकडो वर्षांची परंपरा असलेली आळंदी ते पंढरपूर आषाढी दिंडीवारीला प्लास्टिक बंदीचा फटाका बसणार आहे. ही आषाढीवीरी ७ जुलै पासून सुरू होत आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी चालत हरिनामाचा गरज करत भरपावसात चालत असतात. माऊलीच्या भक्तीत न्याहाळुन ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता वारकरी पंढरीची वाट शोधत चालत असतो. त्यात सध्या पाऊसाची सर सुरु असुन वारक-यांना या पाऊसात प्लास्टिक कागदाचा दिलासा मिळत असतो. मात्र आता प्लास्टिक बंदीमुळे वारक-यांच्या रोजच्या वापरातील प्लास्टिक वस्तुंचा वापर होणार नसल्याने चिंता वाढली आहे. वारी काळात पावसापासुन रक्षण करण्यासाठी वारकरी छत्री ऐवजी प्लास्टिक कागद” वापराणे पसंद करतो. पण आता प्लॅस्टिक कागदावर बंदी आल्याने वारक-यांसमोर मोठं संकट उभं रहाण्याची चिन्ह आहे. वारक-याला पाऊस चालू असताना छत्री घेऊन चालणे खूपच त्रासाचे असते त्यामुळे कागद डोक्यापासून गुडघ्यापर्यंत घेतला की चालणे अवघड होतं नाही, शिवाय पाऊस गेला की त्याची घडी करून चालताना सोपे जाते.

प्लास्टिक बंदी आणि वारी

प्लास्टिक कागद पावसात डोक्यावर असतो, क्षणभर विश्रांतीच्या वेळेस ओल्या जमिनीवर टाकून बसायला,जेवायला, झोपायला, जोराचा पाऊस सुरू झाला तर हाच कागद गळणा-या तंबूवरही टाकता येतो, स्वत:जवळील वस्तुंचे पावसापासुन संरक्षण याच प्लास्टिक कागदावरच अवलंबुन असते. त्यामुळे दिंडीवारी दरम्यान हा प्लॅस्टिक कागद महत्वाचा मानला जातो. यावर पर्याय म्हणुन रेनकोट वापर करता येईल मात्र रेनकोटची बाजारातील किंमत पहायला वारक-यांची अडचण होणार आहे. प्लास्टिक कागदा बरोबर इतर प्लास्टिक वस्तुंचाही वापर अडचणीचा ठरणार आहे. पर्यावरणाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन राज्य सरकारने केलेली प्लास्टिक बंदी आता आषाढी वारीमध्ये वारक-यांसाठी संकटच घेऊन आली आहे. प्लास्टिक वर कायदयाने बंदी आणली खरी मात्र भरपावसात हरीनामाचा गरज करत थंडी-वा-यात पायी चालणा-या महिला-पुरुष लहान चिमुकल्यांना या बंदीचा सामना करावा लागणार आहे. दिंडी सुरु असताना काही दानशुर व्यक्ती वारक-यांना खाऊचे साहित्य,पाणी,पावसाचे कागद अशा प्लास्टिक पासुन तयार केल्या वस्तुंचे मोफत वाटप केले जाते. मात्र प्लास्टिक बंदीमुळे यावर्षी दिडीवर संकटच म्हणावं लागेल. वारी दरम्यान वारक-यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे स्वत:च्या उपजिविकेच्या वस्तु, पिण्याच्या पाण्यासाठी बाटली, प्लास्टिक कागद, खाण्यासाठी पदार्थ साठवणुक अशा अनेक गोष्टींसाठी प्लास्टिकचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. पर्यायाने प्लास्टिक बंदीमुळे आता वारक-यांवर मोठे संकटच उभं रहाणार आहे.

आषाढी वारीदरम्यान प्लास्टिकचा वापर

  • प्लास्टिक कागद
  • प्लास्टिक पिशव्या
  • फ्लास्टिक चमचे
  • पाणी बाटली,
  • प्लास्टिक कप, ग्लास, स्ट्रॉ
  • थर्माकोल ताट, ग्लास आणि वाट्या
  • उत्पादने साठविण्यासाठी असलेली प्लास्टिक
  • अन्नपदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक
    यावर असल्याने वारकरी या वस्तुंचा वापर कसा करणार? प्लास्टिक वापराबाबत वारक-यांना दंडात्मक कारवाई? यावर सक्षम पर्याय काय असेल यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

आषाढी पायीवारी करत असताना पावसाच्या सरी होत असतात. त्यामुळे प्लास्टिक कागदाचा वापर करणं वारक-यांना सोयीस्कर होत असते. त्यामुळे प्लास्टिक बंदी असताना वारक-यांना वारी दरम्यान सवलत देण्याची आवश्यकता आहे.
-राणी जगताप/रासकर – नगरसेवक आळंदी नगरपरिषद.

वारीदरम्यान वारकरी प्लास्टिक घोंगटाचा व इतर वस्तुंचा वापर करत असताना घरातुन निघाल्या पासुन ते संपुर्ण वारी पुर्ण होई पर्यत एकच वापरत असतो. त्या घोंगट्याला कुठेही फेकत नाही,त्यामुळे पर्यावरणाला धोका होईल असं कधीच वागत नाही. त्यामुळे प्लास्टिक बंदीतुन वारकरी वगळावेत, किंवा वारक-यांसाठी अल्पदरात पावसातुन बचावासाठी पर्यायी व्यवस्था करावी. वारक-यांना छत्री ही पर्यायी व्यवस्था होऊ शकणार नाही अस स्पष्ट मत आहे.
-हरिदास पालवे-शास्त्री,आळंदी देवस्थान विश्वस्त.

- Advertisement -

रोहिदास गाडगे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -