घरमहाराष्ट्रEknath Khadse : चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर नाथाभाऊ म्हणतात, अफवांवर विश्वास ठेवू नका

Eknath Khadse : चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर नाथाभाऊ म्हणतात, अफवांवर विश्वास ठेवू नका

Subscribe

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी) काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी अशोक चव्हाण यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे. यावेळी अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक अमर राजूरकर यांनीही आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अशातच शरद पवारांसोबत असलेले एकनाथ खडसे हे सुद्धा भाजपात प्रवेश करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. यावर आता एकनाथ खडसे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे. (Eknath Khadse After Chavan entry into BJP Nathabhau says dont believe rumours)

हेही वाचा –Maharashtra Politics : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला ‘या’ व्यक्तीवरही शाश्वती नाही 

- Advertisement -

भाजपाचे वरिष्ठ नेते राहिलेल्या एकनाथ खडसेंनी भाजपची साथ सोडून काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत भाजपासोबत सरकार स्थापन केले. अजित पवार हे सुद्धा काही महिन्यांपूर्वी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. तसेच निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह दिले आहे. या सर्व राजकीय घडामोडीनंतर आता काँग्रेसमध्येही फूट पडताना दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेक नेते संभ्रमात आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे हे भाजपात येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा – Politics : राज्यसभेसाठी शरद पवारांचा नवा मास्टरस्ट्रोक; ‘या’ उमेदवाराचा प्रस्ताव मांडला

- Advertisement -

एकनाथ खडसे यांनी ट्वीटमध्ये काय म्हटले?

एकनाथ खडसे यांनी ट्वीट करताना म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून मी भाजपामध्ये प्रवेश करणार, अशा आफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मात्र मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार आहे. कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -