घरमहाराष्ट्रभाजपात येणारे काही साधूसंत नाहीत; मेगाभरतीवर खडसेंची टीका

भाजपात येणारे काही साधूसंत नाहीत; मेगाभरतीवर खडसेंची टीका

Subscribe

भाजपमध्ये प्रवेश घेणारे नेते हे काही साधू संत नाहीत. भाजपची विचारधारा आवडली म्हणून काही ते पक्षात प्रवेश घेत नाहीयेत. त्यांना सत्तेत वाटा हवा आहे किंवा सत्तेची ऊब हवी आहे, यासाठी ते सत्तापक्षात येत असल्याची टीका खडसे यांनी केली. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकनाथ खडसे यांनी हे भाष्य केले आहे. पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. मानसन्मान, पदासाठी पुर्वीपासूनच लोक सत्ताधारी पक्षांमध्ये येत असतात. सत्ता आली की लोक धावत येतात, सत्ता गेली की लोक निघून जातात. राजकारणात हे होतंच राहते. आमच्याकडे येणारे काही साधुसंत नाहीत.

घरकुल घोटाळ्यात माजी मंत्री सुरेश जैन यांना १०० कोटींचा दंड ठोठावला आहे. कोर्टाच्या या निर्णयाचे खडसे यांनी स्वागत केले आहे. सुरेश जैन हे आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी सतत सत्ताधारी पक्षात प्रवेश करत होते, मात्र आता त्यांना शिक्षा सुनावली असल्यामुळे खडसे यांनी समाधान व्यक्त केले. मात्र जैन यांच्याप्रमाणेच इतर पक्षातील लोक भाजपमध्ये येत आहेत, यावर प्रश्नावर प्रतिक्रिया देताना खडसे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे वॉशिंग पावडर आहे. इतर पक्षातील नेत्यांना घेताना आम्ही धुवून घेतो.

- Advertisement -

नारायण राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार हे मी बऱ्याच वर्षांपासून ऐकत आहे. मात्र अद्याप त्यांचा प्रवेश झालेला नाही. राणे यांना पक्षात घेण्यासंदर्भात भाजपने शिवसेनेच्या दबावाखाली येण्याची गरज नाही. तसेच शिवसेनेने देखील भुजबळ यांना घेण्यासंदर्भात भाजपशी बोलण्याची गरज नाही. आपल्या पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा हा दोन्ही पक्षांचा अंतर्गत निर्णय असून मित्र पक्ष असले तरी त्यामध्ये दबाव आणण्याची गरज नसल्याचे खडसे म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -