घरताज्या घडामोडीफोन टॅपिंग प्रकरणातील मास्टरमाईंडची माहिती मिळाली पाहिजे, एकनाथ खडसेंची मागणी

फोन टॅपिंग प्रकरणातील मास्टरमाईंडची माहिती मिळाली पाहिजे, एकनाथ खडसेंची मागणी

Subscribe

फोन टॅपिंग प्रकरणात माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. परंतु कोर्टाने तो रिपोर्ट अमान्य केला होता. या अहवालात काही त्रुटी असल्यामुळे आणखी तपास करून त्रुटींची पूर्तता करा, असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणातील मास्टरमाईंडची माहिती मिळाली पाहीजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांची राज्य सरकारकडून चौकशी करण्यात आली. त्याचा क्लोजर रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आला होता. कोर्टाने क्लोजर रिपोर्ट रिजेक्ट केला. तसेच या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी, अशा स्वरुपाचे आदेश देण्यात आल्याचे वर्तमान पत्रात वाचले. रश्मी शुक्ला यांनी 68 दिवस माझाही फोन टॅप करण्यात आला होता. त्यामध्ये आता पुन्हा एकदा सरकार त्याची चौकशी करणार आहे. माझा फोन टॅप करण्यात आला असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी हेतू असेल, असं खडसे म्हणाले.

- Advertisement -

माझा जबाव न घेता क्लोजर रिपोर्ट सादर केला गेला. या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्यांचा फोन टॅप केला त्यांना समोर बोलावून जवाब घेतले पाहिजे. कारण हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. फोन जर अशा रितीने टॅप होत असतील तर हे बरोबर नाहीये. तसेच रश्मी शुक्ला यांच्या मागे कोण आहे याची माहिती मिळाली पाहिजे. अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

माझा जर फोन टॅप होत असेल तर यासंदर्भातील माहिती मला मिळाली पाहीजे. चौकशी होईल तेव्हा होईल. परंतु प्रथमदर्शन यामध्ये काही तथ्य असेल तर अधिकाऱ्यांविरोधात आपण काय कार्यवाही करणार आहात. याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळालं पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा : २०२४ मध्ये करेक्ट कार्यक्रम करण्याचं चॅलेंज स्वीकारतो, बावनकुळेंचं अजित पवारांना आव्हान


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -