घरमहाराष्ट्रअखेर एकनाथ खडसेंची हाक दिल्लीने ऐकली; खडसेंना न्याय मिळणार?

अखेर एकनाथ खडसेंची हाक दिल्लीने ऐकली; खडसेंना न्याय मिळणार?

Subscribe

दोन दिवसांपूर्वी भाजपची उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची विभागनिहाय बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर आज खडसे दिल्लीला रवाना होणार आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज दिल्लीला जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून खडसे महाराष्ट्रातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवर नाराज आहेत. खडसे यांना पक्षाकडून वगळण्यात येत असल्याची खंत त्यांनी याअगोदरही व्यक्त करुन दाखवली आहे. याशिवाय दोन दिवसांपूर्वी भाजपची उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची विभागनिहाय बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर आज खडसे दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीत ते महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि भाजप महामंत्री बी एल संतोष यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे खडसे यांची हाक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे, असे बोलले जात आहे. दरम्यान, आता खडसेंना पक्षश्रेष्ठींकडून न्याय मिळतो का? ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.

भाजपकडून खडसेंवर खरच अन्याय झाला का?

महाराष्ट्रात भाजप पक्षाचा पाया भक्कमपणे रोवणाऱ्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या पंगतीत एकनाथ खडसे यांचे नाव घेतले जाते. एकनाथ खडसे जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून गेल्या दोन दशकांपासून जिंकून येत होते. मात्र, यावेळी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यांच्या व्यतिरिक्त भाजपने त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. ‘रोहिणी यांना निवडणुकीत पाडण्यासाठी भाजपच्याच काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा हात आहे आणि त्यांचे नाव पुराव्यानिशी मला ठाऊक आहेत’, असे खडसे एका पत्रकार परिषदेत बोलले होते.

- Advertisement -

दरम्यान, त्यांच्या या आरोपावरुन भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आरोप सिद्ध करुन दाखवण्याचे आवाहन केले होते. खडसेंनी त्यांच्या या आव्हानाला चोख प्रत्युत्तर देखील दिले होते. मात्र, खडसे यांची मनधरणी करण्यात भाजपला यश आल्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ती नावे घोषित केली नाहीत.

भाजपला २०१४ साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतांनी यश आले. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सत्तेत आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद पक्षाकडून देण्यात आले. तर खडसे यांना महसूलमंत्रीपद देण्यात आले. मात्र, त्यानंतर लगेच अचानक खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराशी संबंधित विविध आरोप होऊ लागले. त्यामुळे खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे खडसे यांना काही प्रकरणांमध्ये क्लीन चीट मिळाली, मात्र त्यांना मंत्रीपद परत मिळाले नाही. याशिवाय भ्रष्टाचारांच्या आरोपांचे कारण देऊन खडसे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलीला उमेदवारी देण्यात आली.

- Advertisement -

याशिवाय खान्देशात भाजप आणि खडसे असे समीकरण झाले होते. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना दूर सारुन जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांना जवळ केले. त्यामुळे खान्देशात खडसे समर्थक आणि गिरीश महाजन समर्थक असे दोन गट पडले. पक्षांतर्गत पडलेल्या या गटाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळाले. अमळनेर येथे माजी आमदार बी. एस. पाटील यांना भर कार्यक्रमात पक्षाच्याच कार्यकर्त्यांकडूनच झालेली मारहाण हे त्याचेच एक उदाहरण आहे.

सध्या खान्देशात भाजप पक्षाकडून होणाऱ्या अनेक कार्यक्रमांना खडसे यांना निमंत्रण नसते किंवा त्या कार्यक्रमांमध्ये खडसे उपस्थित राहत नाहीत. याशिवाय विविध बैठकांचे देखील खडसे यांना निमंत्रण नसते. याबाबत खुद्द खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. आता या सर्व घडामोडींनंतर खडसे यांच्यावर जर राज्यातील पक्षकारणींकडून त्यांच्यावर अन्याय झाला आहे का? आणि त्यावर दिल्लीत बसलेली पक्ष कार्यकारणी काय निर्णय घेते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -